Neighbor Dispute in Kalyan over Barking Dog: कुत्रा भुकल्यावरुन वाद, 10 महिलांचा पुरुष आणि कुटुंबीयांवर हल्ला; ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घटना
Thane Crime News: पाळीव कुत्र्याच्या भुंकण्यावरून भाजी विक्रेत्यासह त्याच्या कुटुंबीयांवर मारहाण केल्याप्रकरणी ठाण्यातील कल्याण परिसरात पोलिसांनी 10 महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वाचा सविस्तर वृत्त.
पाळीव कुत्र्याच्या (Pet Barking ) भुंकण्याने संतप्त होऊन पती, त्याची पत्नी आणि मुलीला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी 10 महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणे (Thane Crime News) जिल्ह्यातील कल्याण (Kalyan) येथील अंबीवली परिसरात ही घटना रविवारी (5 जानेवारी) संध्याकाळी घडली. या प्रकरणात खडकपाला पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेबाबत बोलताना पोलिसंनी सांगितले की, पीडित, भाजी विक्रेता आणि आरोपी महिला हे शेजारी असून त्यांच्यात वादाचा इतिहास आहे. रविवारी संध्याकाळी, विक्रेत्याच्या पाळीव कुत्र्याने (Pet Dog News) भुंकायला सुरुवात केली, ज्यामुळे आरोपी संतापले आणि त्यांनी समूहाने जाऊन विक्रेत्यावर हल्ला चढवला.
भाजी विक्रेत्याच्या घरावर दगडफेक
पोलिसांनी सांगितले की, भाजी विक्रेता आणि आरोपी यांच्यात पूर्ववैमनस्य आहे. त्यातच भाजी विक्रेत्याचा पाळीव कुत्रा रविवारी सायंकाळी अचानक भुंकला. ज्यामुळे आरोपी कुटुंब चिडले. या कुटुंबातील महिला आणि समर्थकांनी विक्रेत्याच्या घरावर अचानक हल्ला चढवला. ज्यामध्ये भाजी विक्रेत्याची पत्नी आणि महिला यांना लक्ष्य करण्यात आले त्यांनी त्याच्या घरावर दगडफेक करून तोडफोड केल्याचा आरोप आहे. (हेही वाचा, Telangana Animal Cruelty Horror: पाय आणि तोंड बांधून 32 कुत्रे 40 फूट उंच पुलावरून फेकले, 21 कुत्र्यांचा मृत्यू, 11 गंभीर)
जखमा आणि पोलिस कारवाई
आरोपींनी केलेल्या हाणामारीत विक्रेता आणि त्याचे कुटुंबीय जखमी झाले. या घटनेनंतर विक्रेत्याने पोलिसात तक्रार दाखल केली. खडकपाडा पोलिसांनी सोमवारी आरोपी महिलांविरोधात हिंसाचार, बेकायदेशीरपणे एकत्र येणे, द्वेषपूर्ण हेतूने अतिक्रमण करणे आणि हानी पोहोचवणे किंवा अशांतता निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेल्या कारवाईसह विविध कलमांखाली एफआयआर दाखल केला. (हेही वाचा, Crab and Puppy Viral Video: खेकडा आणि श्वानच्या पिलाची गोंडस मैत्री, व्हायरल व्हिडिओ पाहून लोक म्हणाले- आजवरची सर्वात विचित्र मैत्री)
स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण
दरम्यान, या घटनेमुळे या भागातील शेजाऱ्यांमध्ये वाढत असलेल्या वादाबाबत चिंता निर्माण झाली आहे. पोलिसानी रहिवाशांना संघर्ष शांततेत सोडवण्याचे आणि कायदा हातात घेणे टाळण्याचे आवाहन केले आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे.
पाठिमागील काही काळापासून कल्याण हे शहर प्रचंड चर्चेत आहे. कधी ते फेरिवाल्यांकडून केले जाणारे अतिक्रमण आणि ते हटविण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर याच फेरिवाल्यांकडून होणारे हल्ले यांमुळे चर्चेत असते. कधी या शहरात मराठी विरुद्ध अमराठी असावा उद्भवतो. ज्यामुळे स्थानिक विरुद्ध स्थलांतरीत आणि खास करुन परप्रांतिय नागरिक असा संघर्ष निर्माण होतो. दुसऱ्या बाजूला हे शहर इतरही गुन्हेगारी कृत्यांमुळे चर्चेत असते. खास करुन गुंडगिरी, स्थानिक रिक्षावाले विरुद्ध प्रवासी असा वाद आणि यासोबतच महिलांची छेडछाड आणि बलात्कार यांसारखेही काही गुन्हे पाठिमागील काही काळात नोंदवले गेले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)