Thane: ठाणे येथे अनधिकृत फेरिवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यावर हल्ला

तर याआधी महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.

Representative Image (Photo Credits: File Photo)

Thane:  ठाणे येथे एका नारळ विक्रेत्याने महापालिकेच्या अधिकऱ्यावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर याआधी महापालिका अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. आता कारवाई करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला करत नारळ विक्रेत्याने असे म्हटले की, गेल्या वेळी बोट कापली होती पण आता शरीर कापू असे म्हटले. समोर आलेली ही घटना महापालिका आयुक्तांच्या बंगलाच्या मागील बाजूस झाली असल्याचे सांगितले जात आहे.

अनधिकृत फेरिवाल्यांच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. त्यानुसार कारवाई करण्यास गेलेल्या एका विक्रेत्याने अधिकाऱ्यांना त्याच्याजवळ असलेल्या चाकूचा धाक दाखवत धमकावले. ही घटना दोन दिवसांपूर्वीची असून याबद्दल कोणताही नोंद करण्यात आलेली नाही.(Chit Fund च्या नावाखाली 13 महिलांना 60 लाखांचा गंडा; पुण्यातील जोडप्याला अटक)

दरम्यान, माजिवाडा-मानपाडाच्या AMC कल्पिता पिंपळे या अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेल्या असताना त्यांच्यावर अमरजीत यादव नामक फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तर अंगरक्षकाचे 1 बोट तुटून पडले. खरंतर आरोपीने त्यांच्या डोक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिंपळे यांनी त्याचवेळी डोक्यावर हात ठेवल्याने बोटांवर प्रहार झाला आणि बोटं तुटून पडली. सध्या त्यांच्यावर ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.  तर पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी अमरजीत यादव याला न्यायालयाने  न्यायालयीन कोठडी सुद्धा सुनावली होती.