Tuition Teacher Rape Case: अल्पवयीन मुलीवर बलात्कार; ठाणे येथील ट्युशन शिक्षकास अटक

Thane Crime News: ठाणे येथील एका 50 वर्षीय शिकवणी शिक्षकाला ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान एका 17 वर्षीय विद्यार्थ्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. केस आणि पोलिस कारवाईबद्दल अधिक वाचा.

Rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

ठाणे (Thane) जिल्ह्यातील पोलिसांनी 50 वर्षीय ट्युशन शिक्षकाला (Tuition Teacher) 17 वर्षीय विद्यार्थिनीवर वारंवार बलात्कार (Thane Rape Case) केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. पहिल्या वर्षाच्या बॅचलर ऑफ आर्ट्स (BA) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आली. तिने वर्षभरापेक्षा जास्त काळ हा छळ सहन केला होता. संशयित शिक्षकावर पॉक्सो (POCSO Act) कायद्यान्वयेगुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विश्वासाचा गैरफायदा घेऊन अत्याचार

पोलिसांनी सांगितले की, भाईंदर येथे खासगी ट्युशन क्लासेस घेणारा आणि तेथीलच विद्यार्थिनीच्या घरी शिकवण्यासाठी जाणारा हा शिक्षक कथीतरित्या तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेत होता. नवघर पोलिस ठाण्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या शिक्षकाने विद्यार्थिनीच्या शैक्षणिक आणि करिअरच्या प्रगतीबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने तिचा विनयभंग केला. तिने कोणालाही याबाबत सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही त्याने तिला दिली. आरोपीने ऑक्टोबर 2023 ते नोव्हेंबर 2024 दरम्यान ट्युशन सेंटर आणि विद्यार्थिनीच्या घरी कोणीही नसताना अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला, असे अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा, Minor Girl Raped in Mumbai: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती; 17 वर्षीय मुलावर POCSO कायद्याखाली गुन्हा दाखल)

पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल

अलीकडेच पीडितेने आपल्या आईला या गुन्ह्याबाबत सांगितले आणि दोघींनी मिळून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 64(2)(द) (बलात्कार), 74 (स्त्रीच्या मर्यादेचा भंग करण्याच्या हेतूने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर), आणि 351(2) (गुन्हेगारी धमकी) तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या तरतुदींखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणाने स्थानिक समुदायात संतापाची लाट पसरली असून, खासगी ट्युशन सेटिंग्जमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे.

अन्याय अत्याचाराविरोधा माहिती आणि मदत

महिला आणि लहान मुले यांच्यावरील कोणत्याही प्रकारच्या अन्याय, अत्याचार यांची तक्रार करण्यासाठी आणि मदत मिळवण्यासाठी सेवा उपलब्ध असतात. फक्त आपण तिथपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे असते. स्वत:बद्दल किंवा पीडिताबद्दल माहिती देणे आणि मदत मिळविणे यासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधून मदत मिळवा:

महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक:

चाइल्डलाइन इंडिया: 1098; हरवलेली मुले आणि महिला: 1094; महिला हेल्पलाइन: 181; महिला हेल्पलाइनसाठी राष्ट्रीय आयोग: 112; राष्ट्रीय महिला आयोग हिंसेविरुद्ध हेल्पलाइन: 7827170170; महिला आणि ज्येष्ठ नागरिक पोलीस हेल्पलाइन: 1091/1291.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement