ठाणे: टिकुजिनी वाडी रिसॉर्टमधील नोकरी कायम राहावी यासाठी महिला सुरक्षारक्षकाकडे शरीर सुखाची मागणी
ठाणे (Thane) येथील टिकुजिनी वाडी (Tikuji-ni-Wadi) या रिसॉर्टमधील महिला सुरक्षारक्षकाची नोकरी कायम रहावी यासाठी तिच्यासाठी शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाणे (Thane) येथील टिकुजिनी वाडी (Tikuji-ni-Wadi) या रिसॉर्टमधील महिला सुरक्षारक्षकाची नोकरी कायम रहावी यासाठी तिच्यासाठी शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर शरीरसुखाची मागणी करणारा व्यक्ती तिचाच सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.
गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला आहे. पीडित महिलेला स्वच्छतागृहाजवळ बोलावत नोकरी कायम रहावी असे वाटत असल्यास शरीरसुखाची मागणी करण्यात आली. तसेच पीडित महिलेचा विनयभंग सुद्धा करण्यात आला असल्याचे तिने पोलिसांना सांगितले आहे. टिकुजिनी वाडीमधील सुरक्षारक्षकांसाठी असणारी कंपनी बदलणार असल्याने हा प्रकार घडला आहे.(पुणे: मुलीसोबत फोनवर बोलू देत नसल्याचा राग सासऱ्यांना पडला महागात, जावयाने घेतला गालाचा चावा)
तर गेल्या काही काळापासून या रिसॉर्टमध्ये बेशिस्त कारभाराचे असे किस्से यापूर्वीसुद्धा समोर आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रिसॉर्टचा हा कारभार थांबला नाही तर मनसे कडून धडा शिकवला जाईल अशी तंबी देण्यात आली आहे.