Thane Shocker: खिडकीच्या ग्रिल्सच्या गॅपमधून पडून 5 वर्षीय मुलाचा मृत्यू
सध्या त्याच्या मृत्यू प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.
ठाणे (Thane) जिल्ह्यातील मुंब्रा (Mumbra) येथे एक 5 वर्षीय मुलगा सातव्या मजल्यावरून कोसळून मृत पावला आहे. ही घटना शनिवार 9 सप्टेंबरच्या संध्याकाळची आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मृत मुलाचं नाव इब्राहिम आहे. घरात खिडकीच्या ग्रिल मध्ये गॅप होती. या गॅपमधून तो खाली पडला. मुलाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्याला डॉक्टरांनी तेथेच मृत म्हणून घोषित केले आहे.
इब्राहिमच्या मृत्यूची नोंद अपघाती निधन अशी करण्यात आली आहे. सध्या त्याच्या मृत्यू प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. अशी माहिती मुंब्रा पोलिसांकडून देण्यात आली आहे. नक्की वाचा: MP Shocker: 3 वर्षीय मुलाने आईला शेजार्यासोबत विचित्र अवस्थे पाहिले; प्रेमप्रकरणाचा बोभाटा लपवण्यासाठी टेरेसवरून ढकलत घेतला जीव .
काही दिवसांपुर्वी एका चार वर्षाचा मुलाचा मॅनहोलमध्ये वाहून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटने अंतर्गत इमारतीतील अध्यक्ष आणि वॉचमॅनवर गुन्हा दाखल झाला आहे. एनआरआय कॉलनी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक वॉचमन मंगळवारी सकाळी 8:20 च्या सुमारास मॅनहोलचे कव्हर उघडताना दिसले, ही दुर्घटना घडण्याच्या काही क्षण आधी त्यांनी केलेली ही एक गोष्ट त्याचं मृत्यूचं निमित्त ठरलं.