आई-मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्या 3 वर्षांच्या मुलाला इमारतीच्या टेरेस वरून खाली ढकलले आहे. याची कबुली देखील त्या महिलेने दिली आहे. मुलाने या महिलेला शेजार्यासोबत विचित्र स्थितीत पाहिले म्हणून तिने मुलाला संपवल्याचं समोर आलं आहे. ही घटना ग्वालियर मधील आहे.
दरम्यान ही घटना 4 महिन्यांपूर्वीची आहे. या महिलेने मुलगा खेळता खेळता पडल्याचा बनाव रचला होता. आपण मुलाचा जीव घेतल्याची रूखरूख तिला खात होती अशामधून तिने चार महिन्यांनी आपल्या कृतीची कबुली पतीला दिली आहे.
28 एप्रिलची ही घटना आहे. पोलिस कॉन्स्टेबल Dhyan Singh कडे प्लॅस्टिक शॉपचं उद्घाटन होते. त्याने जवळच्या काही लोकांना बोलावले होते. या ठिकाणीच Jyoti Rathore आणि Uday Indolia एकत्र आले होते. त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. कार्यक्रमामध्ये सक़रे व्यस्त असताना ज्योती आणि उदय टेरेस वर गेले आणि एकमेकांच्या जवळ आले होते.
ज्योतीचा मुलगा Jatin Rathore (सनी) हा देखील आईच्या पाठोपाठ वर टेरेस वर आला. त्याने त्याच्या आईला शेजारी राहणार्या उदय सोबत पाहिले. आपलं भांडं फूटेल या भीतीमधून तिने प्रेमप्रकरण लपवण्यासाठी मुलालाच टेरेस वरून ढकलून दिले.
मुलाच्या डोक्याला तो 2 मजल्यांवरून पडला असल्याने गंभीर दुखापती झाल्या होत्या. Jayarogya Hospital मध्ये त्याच्यावर एक दिवस उपचार झाले. मात्र दुसर्याच दिवशी 29 एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. पोलिस कॉन्स्टेबल सह उपस्थितांनाही मुलगा धसमुसळेपणामुळे पाय सरकून पडला असावा असं वाटलं.
ज्योतीला नंतर या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागला. स्वप्नातही मुलगा येऊ लागला. नंतर न रहावल्याने तिने अखेर पतीकडे याची कबुली दिली आहे. पोलिस कॉन्स्टेबल ज्ञान सिंह यांनी महिलेचा ऑडिओ आणि व्हिडिओ बनवला तो Thatipur Police मध्ये एका अर्जासह सादर केला आहे.
अर्जावरून उदय आणि ज्योती यांना पोलिसांनी अटक केली आहे. घटना घडली तेव्हा उदय देखील टेरेस वर हजर होता.