Thane Shocker: रागाने पाहिल्याचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय मुलाने खुपसला 30 वर्ष व्यक्तीच्या पोटात सुरा; 20 तासांनी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारा बाहेर काढलं हत्यार

30 वर्षीय व्यक्तीच्या पोटात सुरा खुपसल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Thane Shocker: रागाने पाहिल्याचा बदला घेण्यासाठी 17 वर्षीय मुलाने खुपसला 30 वर्ष व्यक्तीच्या पोटात सुरा; 20 तासांनी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारा बाहेर  काढलं हत्यार
हल्ला | प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

ठाण्यामध्ये थरकाप उडवणारी एक घटना समोर आली आहे. एका किशोरवयीन मुलाने त्याच्याकडे रागाने पाहणार्‍या एका व्यक्तीच्या पोटात सुरा खुपसला आहे. ही घटना मंगळवार 3 ऑक्टोबरची आहे. उल्हासनगर मध्ये या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. 30 वर्षीय व्यक्तीच्या पोटात सुरा खुपसल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुरा खुपसल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. Hindustan Times, च्या माहितीनुसार पीडीत व्यक्तीचं नाव नितेश वालेकर आहे. तो उल्हासनगरच्या कॅम्प 3 चा रहिवासी आहे. सुरा खुपसण्याच्या या घटनेपूर्वी दोन दिवस आधी त्यंच्यात वाद झाला होता. 17 वर्षांच्या आरोपीने बाईक बेशिस्तपणे चालवण्याने वालेकर भडकले होते. त्यांनी या मुलाला दमदाटी करत त्याच्यासमोर डोळे देखील मोठे केले होते. हाच राग मुलाने मनात ठेवत वालेकरच्या पोटात सुरा खुपसला.

उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ एका सॅन्डव्हिच शॉप मध्ये नितेश मित्रांसोबत उभा असताना या मुलाने सुरा खुपसला. त्याने हा सुरा पुन्हा बाहेर न काढता तेथून पळ काढला. त्यानंतर नितेशला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. 20 तासांनंतर त्याच्या शरीरातून सुरा काढण्यात आला आहे.

उल्हासनगर मध्ये आरोपीच्या मित्राच्या घरातून त्याला अटक करण्यात आले. त्याच्यावर पोलिसांनी कलम 307 आणिअन्य कलमांर्तगत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या मुलाला बदला घ्यायचा होता त्यामुळे त्याने सुरा खुपसल्याचं तो सांगतो असे पोलिसांनी सांगितलं आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 05, 2023 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).