शिवसेना सोडणाऱ्यांना कायद्याची पर्वा न करता तुडवा... बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' व्हिडिओ वायरल

'शिवसेना सोडणाऱ्यांना कायद्याची पर्वा न करता तुडवा,' असा आदेश देताना बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओत दिसत आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Archived images)

शिवसेना आणि भाजप जरी मित्रपक्ष असले तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाने मात्र दोन्ही पक्षांना एकमेकांपासून दूर केलं असल्याचं चित्र सध्या राज्यभर दिसत आहे. भाजपला 105 जागी विजय मिळला असून ते एकटेच सरकार स्थापन करू शकता नाहीत. त्यांना शिवसेना पक्षाची मदत घेणं अनिवार्य आहे. पण अशा वेळी शिवसेना देखील मुख्यमंत्री पद त्यांनाच मिळावं म्हणून असून बसली आहे.

अशा परिस्थितीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या भाषणाचा एक व्हिडिओ सध्या सर्वत्र वायरल होताना दिसत आहे. 'शिवसेना सोडणाऱ्यांना कायद्याची पर्वा न करता तुडवा,' असा आदेश देताना बाळासाहेब ठाकरे या व्हिडिओत दिसत आहेत.

'यापुढे जर शिवसेनेतून एकही आमदार फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. महिलांनीही त्यांच्या अंगावर काय काळबेरं टाकायचं ते टाका. अशांना अशीच शिक्षा झाली पाहिजे,' असं बाळासाहेब ठाकरे या भाषणामध्ये आदेश देताना दिसत आहेत.

पहा व्हिडिओ,

तसेच उद्धव ठाकरे हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. आणि म्हणूनच शिवसेना-भाजपच्या होणाऱ्या बैठकीत शिवसेनेने हजेरी न लावण्याचं ठरवलं.

भाजप-शिवसेना तुटेपर्यंत ताणणार की 'ठरलंय तसंच करणार'? काय म्हणाले उद्धव ठाकरे?

आता येणाऱ्या काळात भाजप आणि शिवसेनेचा वाद नक्की कधी संपतो आणि सरकार कोणाचा आणि मुख्यमंत्री कोणाचा हे बघणं महत्त्वाचं ठरेल.