Kondaibari Ghat Accident: कोंडाईबारी घाटात ट्रकच्या धडकेनंतर स्विफ्ट कार 35 फुट खोल दरीत कोळसली; 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

यात अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे.

Accident Representational image (PC - PTI)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटावर (Kondaibari Ghat) ट्रकने धडक दिल्यानंतर एक कार दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. यात अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाल्याचे समजत आहे. पोलीस आणि गावकऱ्यांच्या सहकाऱ्याने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी प्रत्यक्षदर्शी लोकांचीही विचारपूस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरतकडून धुळ्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ज्यामुळे कार पुलावरून 30 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहे. तर, 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोंडाईबारी घाटात हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात जखमी आणि मयत धुळे जिळ्यातील साक्री तालुक्यातील असल्याचे समजत आहे. तसेच धडक देणाऱ्या ट्रकबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नसून स्थानिक पोलीस कसून चौकशी करत आहेत. हे देखील वाचा- Smart City Nashik, Victoria Bridge: नाशिक येथील अहिल्याबाई होळकर पुलाचे सेन्सर देणार 'धोक्याचा अलर्ट'

याआधी कोंडाईबाई घाटातील या पुलावर एक लक्झरी बस दरीत कोसळली होती. त्यावेळी 5 जणांनी आपला जीव गमवला होता. या अपघाताला एक महीना पूर्ण झाला नाही तर, आजच्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या पुलाच्या कठड्याची दुरुस्ती लक्ष दिले नसल्याचे समोर आले आहे.