औरंगाबाद: चारित्र्याच्या संशयातून पत्नीसह पोटच्या 2 मुलाची हत्या; आरोपी पोलिसांच्या स्वाधीन

चारित्र्याच्या संशयातून एका 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीसह पोटच्या 2 मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) येथील बीड (Beed) येथे रविवारी घडली.

Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

चारित्र्याच्या संशयातून एका 35 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीसह पोटच्या 2 मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) येथील बीड (Beed) येथे रविवारी घडली. आरोपीने हत्या केल्यानंतर स्वताला बीड पोलिसांच्या (Beed Police) स्वाधीन केले. त्यानंतर बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीची पत्नी आणि दोन मुलाचे मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

संतोष कोकणे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. संतोष हा सेल्समेनचे काम करत करून आपली पत्नी संगिताच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडायचे. रविवारी दुपारी याच कारणांवरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी संतापाच्या भरात संतोषने आपली पत्नी संगिताच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर संतोषने आपल्या दोन्ही मुले संदेश आणि मयूर यांनाही पाण्याच्या पिंपात बुडवून ठार केले. हत्या केल्यानंतर संतोषने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने आपल्या वृत्तात दिली आहे. या घटनेने संपूर्ण बीड हादरून गेले आहे. हे देखील वाचा- धक्कादायक: यवतमाळ येथे एका तरुणाने दारुड्या पिताच्या डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

 बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि त्याची पत्नी संगिता यांच्यात वारंवार वाद होत असे. आपल्या पत्नीचे इतर कोणाशी अनैतिक संबंध असल्याच्या त्याला संशय होता. यामुळे त्यांच्यात वारंवार वाद होत असे. यातूनच रविवारी संतोषने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या केली.
Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement