महाराष्ट्रावर (Maharashtra) कोरोना विषाणूने थैमान घातले असताना यवतमाळ येथे एका तरुणाने पिताच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पिंपळगाव (Pimpalgaon) परिसरातील बुटले लेआऊटमध्ये रविवारी घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याजवळून कुऱ्हाड जप्त केली आहे. दारुड्या पित्याकडून वारंवार आईच्या चरित्र्यावर संशय घेवून शिवीगाळ केली जात होती. रविवारी रात्री यातूनच संतापलेल्या मुलाने आपल्या 70 वर्षीय वडिलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्यांना जिवानिशी ठार केले. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून मुलाविराधोत हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
रामचंद्र रामदयाल ठाकरे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रोजमजुरी करणाऱ्या ठाकरे कुटुंबात आई, मुलगा आणि वडील असे तिघे जण राहत आहेत. रविवारी रामचंद्र दारू पिऊन घरी आले. त्यानंतर रामचंद्र यांनी आपली पत्नी लीला ठाकरे चारित्र्याच्या संशयावरून शिवगाळ सुरू केली. यावर संतापलेला अरूष ठाकरे याने वडिल रामचंद्र यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव केले. यात रामचंद्र जमीनीवर कोसळले. त्यानंतर अरुष आणि लीलाने रामचंद्र यांना घरात घेऊन गेले. तसेच घटनेच्या ठिकाणी सांडलेल्या रक्तावर पाणी टाकून ते साफ केले. दरम्यान, स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी रामचंद्र यांना रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, रुग्णालयात त्यांना मृत घोषीत केले. हे देखील वाचा- धक्कादायक: विरार येथे जन्मदात्या बापाकडून 20 वर्षीय मुलीची हत्या; आरोपी अटकेत
COVID-19: मुंबईतील Rajawadi Hospital मधील कोरोना रुग्णाच्या मृतदेहाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल - Watch Video
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीच्या संख्येत मोठी घट झाल्याचे बोलले जात असताना यवतमाळ येथील घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपीविरुद्ध भादंवि 302 कलमानुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.