धक्कादायक: विरार येथे जन्मदात्या बापाकडून 20 वर्षीय मुलीची हत्या; आरोपी अटकेत

संपूर्ण महाराष्ट्र कोरोना विषाणूशी झुंज देत असताना विरार (Virar) येथे जन्मदात्या पित्यानेच 20 वर्षीय मुलीच्या डोक्यात हातोडीचा घाव घालत हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी 9.30 वाजता घडली आहे.

धक्कादायक: विरार येथे जन्मदात्या बापाकडून 20 वर्षीय मुलीची हत्या; आरोपी अटकेत
Murder | File Image

संपूर्ण महाराष्ट्र कोरोना विषाणूशी झुंज देत असताना विरार (Virar) येथे जन्मदात्या पित्यानेच 20 वर्षीय मुलीच्या डोक्यात हातोडीचा घाव घालत हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी सकाळी 9.30 वाजता घडली आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. खुनात वापरलेला हातोडा पोलिसांनी हस्तगत करण्यात आला असून आरोपीवर कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हत्या मागचे कारण अस्पष्ट असून स्थानिक पोलीस मृताची आई आणि मोठ्या भावाची चौकशी करत आहेत.

आकांक्षा असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून ती आपल्या पालकांसोबत विरार येथील तिरुपती नगर परिसरातील रहिवाशी आहे. आकांशा, स्थानिक महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थी होती. शनिवारी सकाळी आकांशा आणि तिचे वडील दत्ताराम जोशी यांच्यात वाद झाला. या वादातून जोशी यांनी आकांक्षा हिच्या डोक्यात होताड्याने दोन-तीन वेळा घाव केला. दरम्यान, आकांक्षाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर शेजाऱ्यांनीच तिला रुग्णालयात नेले. मात्र,रुग्णालयात तिला मृत घोषीत करण्यात आले. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा आकांक्षाची आई आणि मोठा भाऊ घरातच असून त्यांचीही चौकशी सुरु आहे. तसेच आकांक्षाचाही मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. हे देखील वाचा- नांदेड: उमरी मध्ये साधूचा मृतदेह आश्रमात आढळल्याने खळबळ; पोलिस तपास सुरू

कर्नाळा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मृतांच्या शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीला अटक केली. आरोपीने खुनात वापरलेला हातोडा हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकांक्षाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून खूना मागचे कारण अद्याप समजू शकले नाही.

(The above story first appeared on LatestLY on May 25, 2020 12:10 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).