IPL Auction 2025 Live

Pune Porsche Crash Case: पुणे पोर्श कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक; चालकाने केली होती तक्रार

त्यानंतर चालकाने सुरेंद्र अग्रवाल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Pune Porsche Accident

Pune Porsche Crash Case: पुणे पोर्शे कार अपघात (Accident) प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल याला पुणे पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. याआधी न्यायालयाने मुख्य आरोपी विशाल अग्रवालची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र अग्रवाल याने ड्रायव्हरला धमकावले. त्यानंतर चालकाने सुरेंद्र अग्रवाल विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली असून, त्या आधारे सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरही अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर कलम 365, 366 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला जाणार आहे.

या प्रकरणात अन्य 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. या कालावधीत न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. न्यायालयाने अल्पवयीन विशालला ज्युवेनाईल रिमांड होममध्ये पाठवले आहे. याआधी शुक्रवारी, अपघाताच्या वेळी त्याच्या कुटुंबाचा ड्रायव्हर कार चालवत होता, असे सांगण्यात आले होते. जे चालकाने चौकशीदरम्यान मान्य केले होते. मात्र, त्यानंतर सीपी अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अपघाताच्या वेळी अल्पवयीन मुलगा कार चालवत होता, असे सांगितले. (हेही वाचा -Pune Porsche Car Accident Update: पुणे हिट अँड रन प्रकरणात विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ड्रायव्हरचाही कुबुली जबाब)

सीपी अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, प्राथमिक तपासात ही घटना रात्री अडीच वाजता घडल्याचे सांगण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी कलम 304 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा -  Ravindra Dhangekar on Protest in Pune: पुणे पोलिस आयुक्तांनी राजीनामा द्यावा, पुणे पोर्शे कार अपघातामधील तपास अधिकारी डिफॉल्टर असल्याचा रविंद्र धंगेकर यांचा दावा)

अमितेश कुमार यांनी पुढे सांगितले की, अपघाताच्या रात्री अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे पोलिस ठाण्यात आले होते. यात शंका नाही. ते रेकॉर्डवर आहे. मात्र पोलिसांनी कोणती कारवाई केली आणि कशी केली, याबाबत सध्या काही बोलणे योग्य ठरणार नाही.