Navneet Rana Cast Certificate: खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा; Bombay HC च्या निर्णयाला स्थगिती

8 जूनला नवनीत राणा यांचे जातप्रमाण रद्द करत असल्याचा निर्णय न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने घेतला होता.

Navneet Rana, Anandrao Adsul | (Photo credit: facebook navneet.kaurrana.5,archived, edited and representative images only)

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) काही दिवसांपूर्वी ते रद्द केले होते. मात्र या खोट्या जातप्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. सोबतच तक्रारदारांना नोटीस बजावली आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.   Navneet Kaur Rana: नवनीत कौर राणा यांची खासदारकी धोक्यात, सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जागेवरुन नवनीत राणा खासदार म्हणून लोकसभेत पोहचल्या आहेत. आज सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती देताना सर्व तक्रारदारांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जूनला होणार आहे.

दरम्यान 8 जूनला नवनीत राणा यांचे जातप्रमाण रद्द करत असल्याचा निर्णय न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने घेतला होता. त्या सोबत नवनीत राणा यांना 2 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

2019 च्या लोकसभा निवडणूकीमध्ये नवनीत राणा यांच्या विरूद्ध शिवसेनेचे आनंदराव अडसूळ उभे होते. पराभूत आनंदरावांनी नवनीत राणा यांच्या प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. त्याची न्यायालयीन लढाई ते लढत होते अशातच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द केल्याने त्यांची आमदारकी धोक्यात आली होती.