शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना सुनील तटकरे यांचे प्रत्युत्तर
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांकडून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. यातच राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. एखाद्या प्रश्नाबाबत मतभिन्नता असू शकते. परंतू, खालच्या पातळीवर जाऊन हीन दर्जाची टीका म्हणजे कोत्या मनोवृत्तीची असलेले माणसे कोणत्याही थराला जाऊ शकतात हे दाखवते, असे सुनील तटकरे म्हणाले आहेत. नुकताच त्यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी पडळकर यांच्या वक्तव्यावर नाराजी दर्शवली आहे.
देशाचे नेते असलेले आदरणीय खासदार शरद पवार साहेबांवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली टीका ही हिणकस व हीन प्रवृत्तीचे द्योतक आहे. एखाद्या प्रश्नाबाबत मतभिन्नता असू शकते पण खालच्या पातळीवर जाऊन हीन दर्जाची टीका म्हणजे कोत्या मनोवृत्तीची माणसं कोणत्या थराला जाऊ शकतात हे दाखवते, अशा आशायाचे सुनिल तटकरे यांनी ट्विट केले आहे. हे देखील वाचा- 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना' भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका
सुनिल तटकरे यांचे ट्विट-
गोपीचंद पडळकर काय म्हणाले होते?
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असे माझे मत आहे. ते गेल्या अनेक महाराष्ट्रचे नेतृत्त्व करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. यापुढेही ते चालूच ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे अशी त्यांची भूमिका आहे, असे पडळकर म्हणाले आहेत. तसेच शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत, असे वाटत नाही. त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने 1 हजार कोटींचे पॅकेज घोषित केले होते. परंतू, सरकार गेल्याने त्यांना कारवाई करता आली नाही. मात्र, या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामध्ये पाच वसतीगृह आहेत. एमपीएससी, युपीएससी विद्यार्थी तसेच घरांसंबंधी निर्णय आहेत. विधान परिषदेचे अधिवेशन सुरु झाल्यावर यावर चर्चा करु, असेही ते म्हणाले होते.
याआधी राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड आणि धनंजय मुंडे यांनी देखील गोपीचंद पडळकर यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हापूरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते संतापले आहेत. पडळकर यांनी माफी मागा अन्यथा कोल्हापूरी हिसका दाखवू,असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.