'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना' भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका

भाजपने पडळकर यांचे हे व्यक्तीगत मत आहे. पक्ष त्याच्याशी सहमत नाही. आम्ही पक्ष म्हणून शरद पवार यांचे विरोधक आहोत. त्यांच्या काही भूमिका आम्हाला मान्य नाहीत. हे खरे आहे मात्र त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे

'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना' भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जहरी टीका
Sharad Pawar, Gopichand Padalkar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर अत्यंत जहरी भाषेत टीका केली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरनो आहेत, अशा शब्दात गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)) यांनी शरद पवार यांच्यासंबंधात वक्तव्य केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहीनीशी बोलत होते. दरम्यान, भाजपने मात्र पडळकर यांचे हे व्यक्तीगत मत आहे. पक्ष त्याच्याशी सहमत नाही. आम्ही पक्ष म्हणून शरद पवार यांचे विरोधक आहोत. त्यांच्या काही भूमिका आम्हाला मान्य नाहीत. हे खरे आहे मात्र त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हटले की, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असे माझे मत आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही.  त्यांची बहुजनांबद्दलची भूमिका आता सर्वसामान्य जनतेलाही लक्षात येऊ लागली आहे. त्यांना फक्त राजकारण करायचं आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणाबद्दल सकारात्मक आहेत असं वाटत नाही. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाबद्द पवार ज्या पद्धीतीने वागतात ते पाहिले असता गावगाड्यातील तळागाळातील समाजाशी ते कसा विचार करत असती, हेही आता लोकांच्या लक्षात येत आहे.

पुढे बोलताना पडळकर म्हणाले की,  राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचं आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे', असे पडळकर म्हणाले.

कोरोना व्हायरस संकटाची पार्श्वभूमी विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांनी येत्या काळात विठ्ठल-रुक्मिणी पुजेसाठी पंढरपुरात येणे टाळावे. तसेच, पुजेचा मान एखाद्या सर्वासामान्य भक्ताला द्यावा अशी मागणीही पडळकर यांनी या वेळी केली. या आधीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ते पदावर असताना वारकऱ्यांनी विठ्ठल पुजेसाठी विरोध केला होता. तेव्हा त्यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी विठ्ठल-रुक्मिणी पुजा केली होती. तशाच प्रकारे या वेळीही मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला येणे टाळावे. मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घेतला तर सर्वसामान्य वारकऱ्यांनाही त्याचा अभिमान वाटेल, अशी भावना पडळकर यांनी व्यक्त केली. (हेही वाचा, शरद पोंक्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यासपिठावर, जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण; तर्कवितर्कांवर पडदा टाकण्याच प्रयत्न)

पीटीआयचे ट्वीट-

दरम्यान, पडळकर यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता भाजप प्रवक्त अतुल भातकळकर म्हणाले की, पडळकर यांचे हे व्यक्तीगत मत आहे. पक्ष त्याच्याशी सहमत नाही. आम्ही पक्ष म्हणून शरद पवार यांचे विरोधक आहोत. त्यांच्या काही भूमिका आम्हाला मान्य नाहीत. हे खरे आहे. मात्र, त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे चुकीचे असल्याचे आहे. भातकळकर हे एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2020 01:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).