Summer Special Trains: मध्य रेल्वेकडून पुणे-रत्नागिरी-पनवेल मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळा व मार्ग

अशात रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Railway | Representational Image |(Photo Credits: PTI)

उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये (Summer Vacation) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. उन्हाळी हंगाम- 2023 मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या (Central Railway) समन्वयाने अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेने पुणे-रत्नागिरी-पनवेल (Pune-Ratnagiri-Panvel) मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खासगी बस पुरवठादारांनी बस दरांमध्ये वाढ केली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे. अशात रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मध्य रेल्वेच्या अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या-

गाडी क्र. 01131 पुणे जं.-रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) पुणे जंक्शन येथून सुटेल. 04/05/2023, 11/05/2023, 18/05/2023 आणि 25/05/2023 रोजी दर गुरुवारी ही गाडी 20:50 वाजता. ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी क्र. 01132 रत्नागिरी-पुणे जं. अनारक्षित विशेष (साप्ताहिक) रत्नागिरी येथून 06/05/2023, 13/05/2023, 20/05/2023 आणि 27/05/2023 अशा दर शनिवारी 13:00 वाजता सुटेल. ती त्याच दिवशी 23:55 वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल.

गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकावर थांबेल.

गाडी क्र. 01133 रत्नागिरी-पनवेल अनारक्षित विशेष (साप्ताहिक) रत्नागिरी येथून 05/05/2023, 12/05/2023, 19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी दर शुक्रवारी 13:00 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी 20.30 वाजता पनवेलला पोहोचेल. (हेही वाचा: मुंबई-नागपूर सुपर एक्स्प्रेस वे बनला ‘मृत्यूचा सापळा’; पाच महिन्यात तब्बल 95 लोकांनी गमावले आपले प्राण)

गाडी क्र. 01134 पनवेल-रत्नागिरी अनारक्षित विशेष (साप्ताहिक) पनवेल येथून 05/05/2023, 12/05/2023, 19/05/2023 आणि 26/05/2023 रोजी दर शुक्रवारी 21:30 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी 04:30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकावर थांबेल.

(ही माहिती इंटरनेट आधारीत आहे वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या.)