Mumbai Suicide News: बॅंकेत नोकरी करणाऱ्या महिलेची आत्महत्या; सासरे, नवऱ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, मुंबईतील घटना

कौटुंबिक छळाला कंटाळून बॅंक अधिकारी तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Mumbai Suicide News: कौटुंबिक छळाला कंटाळून बॅंक अधिकारी तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मृत महिलेच्या पती आणि सासरांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप पती आणि सासरांवर केला आहे. महिलेला सासरच्या लोकांकडून छळ होत होता. महिलेकडून पैशाची मागणी करून त्रास देत असे. महिलेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. (हेही वाचा- विरार कारशेड येथे लोकल डब्यात लटकलेला अवस्थेत सापडला मृतदेह,)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वा माजलकर हिने 9 डिसेंबर रोजी दादर पूर्व भोईवाडा येथील राहत्या घरी गळफास लावून घेतला. पूर्वाच्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. पूर्वाचे पती हे सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये काम करतात. पूर्वाच्या आई वडिलांनी तिला दत्तक घेतले होते. पूर्वाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीने  एका बॅंकेत उपव्यवस्थापक म्हणून काम केलं. 2021 मध्ये तीने प्रतिक सोबत लव्ह मॅरेज केल. ती दत्तक असल्याने माहेरच्या लोकांनी तीला हुंडा दिला नाही.

पूर्वाची आई उषा यांनी आरोप केला की, सासरच्या मंडळींना जमीन खरेदी करायची होती त्यासाठी त्यांनी पूर्वाला सांगून पूर्वाच्या वडिलांकडून लाख रुपये उसने घेतले. तसेच ती कामावरून घरी आली की, घर कामाचे भार टाकायाचे. तू दत्तक मुलगी असल्याचे सारखा टोमणा मारयचे. पूर्वाच्या पतीला म्हाडाचा फ्लॅट लॉटरी लागल्यावर पूर्वाच्या माहेरून पुन्हा पैसे मागितले. पूर्वाच्या वडिलांनी अडीज लाख रुपये दिले. तरी देखील तीचा छळ करत राहिले, याचा कंटाळून पूर्वाने आत्महत्या केली.

९ डिसेंबर रोजी पूर्वाला वडिलांना भेटण्यासाठी जायचे होते त्याचे डोळ्यांच ऑपरेशन साठी भेटायला जायचं होतं पंरतु, प्रतिकने फोन करून पूर्वाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती वडिलांना दिली. तक्रारीनुसार, पोलिसांनी पती आणि सासरांविरुध्दा गुन्हा दाखल केला.