Pune Shocker: पुण्यात राहत्या घरात कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या; मुंढवा परिसरातील धक्कादायक घटना

प्राथमिक अंदाजानुसार शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असावी, असं म्हटलं जात आहे. या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या हा सर्व प्रकार लक्षात आल्याने त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली.

Pune Shocker: पुण्यात राहत्या घरात कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या; मुंढवा परिसरातील धक्कादायक घटना
Suicide (pic credit: Wikimedia Commons)

Pune Shocker: पुण्यातील मुंढवा परिसरात (Mundhwa Area) अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील 4 जणांनी आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. मृतामध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. विषारी द्रव्य प्राशन करून या सर्वांनी आपली जीवनयात्रा संपवली.

प्राथमिक अंदाजानुसार शेअर मार्केटमध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असावी, असं म्हटलं जात आहे. या कुटुंबाच्या शेजारी राहणाऱ्या लोकांच्या हा सर्व प्रकार लक्षात आल्याने त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुंढवा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (हेही वाचा - Thane: मानपाडा शाळेत चौथीच्या विद्यार्थ्याचा बेशुद्ध झाल्यानंतर मृत्यू, पोलिसांकडून तपास सुरू)

प्राप्त माहितीनुसार, मृतांमध्ये दिपक थोटे (वय, 59), इंदू दिपक थोटे (वय,45), मुलगा ऋषिकेश दिपक थोटे (वय,24), मुलगी समीक्षा दिपक थोटे (वय,17) यांचा समावेश आहे. दोन महिन्यापूर्वी ते केशवनगर परिसरात राहायला आले होते.

मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजित लकडे यांनी सांगितले की, "कुटुंबाने विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवल्याचा आम्हाला प्राथमिक संशय आहे. आम्ही विश्लेषणासाठी घरातून एक लॅपटॉप आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. काही महिन्यांपूर्वी हे कुटुंब अमरावती येथून मुंढव्याला हलवले होते."

(The above story first appeared on LatestLY on Jan 14, 2023 08:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).