Lockdown: दिल्लीत अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे भुसावळ मध्ये विशेष रेल्वेने आगमन
या रेल्वेत राज्यातील 1 हजार 345 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी 19 जिल्ह्यातील 369 विद्यार्थी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरले. यावेळी या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्या.
Lockdown: दिल्ली (Delhi) अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे आज भुसावळ (Bhusawal) मध्ये विशेष रेल्वेने (Special Train) आगमन झाले. या रेल्वेत राज्यातील 1 हजार 345 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी 19 जिल्ह्यातील 369 विद्यार्थी भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरले. यावेळी या विद्यार्थ्यांनी जल्लोष करत ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा दिल्या.
गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील केंद्रीय लोकसेवा आयोग परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी दिल्लीमध्ये अडकले होते. या विद्यार्थ्यांना राज्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दिल्लीहून विशेष रेल्वे चालवण्यात येणार असल्याचे ठरले होते. (हेही वाचा - Lockdown 4 Guidelines: केंद्र सरकारने जाहीर केले लॉक डाऊन 4 चे नियम; जाणून घ्या 31 मे पर्यंत Night Curfew सह कोणत्या गोष्टी सुरु असतील व काय असेल बंद, See Full List)
दरम्यान, आज दुपारी राज्यातील 1 हजार 345 विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या रेल्वेचे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाले. या विद्यार्थ्यांना रेल्वे स्थानकावर आल्यानंतर आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात आल्या. तसेच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांना आपआपल्या जिल्ह्यात पाठविण्यासाठीचे नियोजन करण्यात आले.
दिल्लीहून परत आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अकोला-24, अमरावती-20, वर्धा-१४, गडचिरोली-8, चंद्रपूर-17, यवतमाळ-17, धुळे-14, नंदूरबार-9, जळगाव-29, औरंगाबाद-31, जालना-13, परभणी-25, नागपूर-33, भंडारा-11, गोंदिया-8, बुलढाणा-30, वाशिम-19, हिंगोली-15, नांदेड-32 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांचे भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला.