State Backward Classes Survey Criteria: राज्य मागासवर्ग आयोगाचे निकष बदलले, Maratha Reservation बाबत महत्त्वपूर्ण माहिती
त्यासोबत ओबीसी आरक्षण (OBC Reservation) वाचविण्यासाठी आणि त्यात इतरांचा समावेश न होऊ देण्यासाठीही संघर्ष सुरु आहे.
Maharashtra State Commission for Backward Classes: मराठा आरक्षण (Maratha Reservation) मुद्द्यावरुन राज्यभरात चर्चा आणि आंदोलने सुरु आहेत. त्यासोबत ओबीसी आरक्षण (OBC Reservation) वाचविण्यासाठी आणि त्यात इतरांचा समावेश न होऊ देण्यासाठीही संघर्ष सुरु आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकार मात्र राज्य सरकारच्या सूचनेवरुन राज्य मागासवर्ग आयोगाकडून मागासलेपणाचे निकष (Living Conditions of Marathas) बदलून सर्वे करण्याचे धोरण ठरले आहे. या सर्वेक्षणाचे निकषही ठरले असून त्याबाबत समाजामध्ये चर्चा सुरु आहे. जाणून घ्या राज्य मागासवर्ग आयोगाचे मागासलेपणाचे नवे निकष. (New Criteria State Commission for Backward Classes)
राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य चंद्रलाल मेश्राम यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, सर्वेसाठी सॅम्पल टेस्टिंग करण्याचे काम गोखले इन्स्टिट्यूटला राज्य मागासवर्ग आयोगाद्वारे मिळाले आहे. या इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्व्हेच्या आधारावर आयोगापूढे अहवाल सादर केला जाणार आहे. तसेच, हा अहवाल पायाभूत मानून चार उपसमित्या सर्वेक्षणाचे काम करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हे काम केवळ 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्ण करुन सदर अहवालावर आयोगाकडून सूचना व हकरती मागविल्या जाणार आहेत. दरम्यान, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यांच्यात सुरु असलेला संघर्ष या सर्वेमुळे थांबणार की अधिक वाढणार याबाबत समाजात मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा, Maratha Reservation: 'मनोज जरांगे यांना देवही घाबरतो, सरकारने त्यांचं ऐकवं, माझाही त्यांना पाठिंबा')
सर्वेक्षणासाठी आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणासाठीचे निकष आणि कंसामध्ये गुण
- जाती/ पारंपरिक व्यवसाय/ हस्तकल कारागिरी/रोजगार या कारणास्तव अशा वर्गाला सामाजिक स्तरात सामान्यतः कनिष्ठ समजले जाते (20)
- असा वर्ग ज्यामधे राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यापेक्षा अधिक स्त्रिया या निर्वाहाकरीता व्यवसाय/रोजगार/ मजुरीमध्ये हलक्या कामात गुंतलेले आहेत (20)
- असा वर्ग ज्यामधे राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपेक्षा अधिक पुरुष हे निर्वाहाकरीता व्यवसाय/रोजगार/ मजुरीमधे हलक्या कामात गुंतलेले आहेत (20)
- असा वर्ग ज्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनुकूल सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण नाही 10
असा वर्ग ज्यामधे राज्याच्या सरासरीच्या पाच टक्क्य़ांपेक्षा अधिक पुरुषांचा आणि दहा टक्क्यांपेक्षा अधिक स्त्रियांचा बालविवाह केला जातो. (20) (हेही वाचा, Chhagan Bhujbal Claims Threat To Life: 'माझी हत्या होऊ शकते'; मराठा विरोधी भूमिकेवरून जीवाला धोका असल्याचा छगन भुजबळांचा दावा)
- असा वर्ग ज्यामधे अंधश्रध्दाळू प्रथा आणि अंधविश्वास सर्रास आढळतो. (10)
असा वर्ग ज्यामधे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या चालीरीती सामान्य आहेत. (10)
एकूण गुण - 100
शैक्षणिक निकष
- असा वर्ग ज्यामधे शाळेत पहिली ते दहावी दरम्यान शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी (10)
- ज्यामध्ये मुलींच्या शाळेतील गळतीचे प्रमाण पहिली ते दहावी या इयत्तांदरम्यान राज्याच्या सरासरीच्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त (20)
- असा वर्ग ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे (10)
- असा वर्ग ज्यामध्ये बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रणाम राज्याच्या एकूण सरासरीच्या 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे (10)
- ज्यामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर किंवा तत्सम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रणाम राज्याच्या एकूण सरासरीच्या 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे (10)
- ज्यामधे व्यवसायिक अभ्यासक्रम उदाहरणार्थ वकीली, वैद्यकीय, अभियांत्रिकी- तंत्रज्ञान , चार्टर्ड अकाउंटंसी , मॅनेजमेंट, डॉक्टरेट यासारखा अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्याच्या एकूण सरासरीच्या 20 टक्क्यांपक्षा कमी आहे. (20)
आर्थिक निकष
- असा वर्ग ज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे प्रमाण राज्याच्या एकूण कुटुंबांपेक्षा 25 टक्क्यांपक्षा जास्त आहे. (20)
- असा वर्ग ज्यामध्ये किमान 30 टक्के लोक हे कच्च्या घरांमध्ये राहतात . कच्च्या घर म्हणजे ग्रामपंचायत कायद्यानुसार कराच्या अनुषंगाने कच्चे घर म्हणून घोषित झालेले घर (10)
- असा वर्ग ज्यामध्ये अल्पभूधारक कुटुंबांची संख्या राज्य सरासरीच्या 10 टक्के अधिक आहे. (10)
- असा वर्ग ज्यामध्ये भूमिहीन कुटुंबांची संख्या राज्याच्या एकूण सरासरीपेक्षा किमान 10 टक्क्यांपेक्षा अधिक आहे (10)
- असा वर्ग ज्यांचे सभासद किंवा संस्थांच्या मालकीच्या कोणत्याही शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रतिष्ठान किंवा रोजगाराचे इतर स्रोत नाहीत. (10)
- असा वर्ग ज्यामध्ये उपभोग कर्ज घेतलेल्या कुटुंबांचे प्रणाम राज्याच्या एकूण सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (10)
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या यासाठी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली बहुजन समाज आक्रमक आहे. त्यामुळे राज्य सरकार यावर काय तोडगा काढते याबाबत उत्सुकता आहे.