Mumbai: भरधाव BEST बसची 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला धडक; विद्यार्थिनीचा मृत्यू, मालवणी येथील घटना
अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बस चालक महादेव एकनाथ ससाणे यांच्यावर निष्काळजीपणामुळे तसेच रॅश ड्रायव्हिंगमुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai: शनिवारी सकाळी मुंबई (Mumbai) च्या उत्तरेकडील मालवणी (Malvani) येथे एका 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला वेगवान बेस्ट बसने (BEST Bus) धडक दिली. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला. मालवणी बस डेपोच्या गेट क्रमांक आठजवळ हा अपघात झाला असून पीडितेचे नाव फरहीन खान असे आहे.
अपघात झाला तेव्हा ती कॉलेजला जात होती. अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बस चालक महादेव एकनाथ ससाणे यांच्यावर निष्काळजीपणामुळे तसेच रॅश ड्रायव्हिंगमुळे मृत्यू झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा-Gadchiroli News: व्हिडिओ बनवताना हत्तीच्या पायाखाली चिरडून वन विभागातील कर्मचाऱ्याचा मृत्यू)
दरम्यान, जून महिन्यात दादरमध्ये बेस्ट बसच्या मागील टायरखाली चिरडून एका 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिला व तिचा पती दुचाकीवरून तांदूळ खरेदीसाठी जात असताना पाठीमागून भरधाव येणाऱ्या बसने त्यांना धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 3 च्या सुमारास श्यामला अलीशेट्टी (48) आणि त्यांचे पती प्रकाश अलीशेट्टी (52) हे दादर येथील ‘अपना सहकार भंडार’ मध्ये तांदूळ खरेदी करण्यासाठी स्कूटरवरून निघाले तेव्हा ही घटना घडली.
सेंचुरी बाजारजवळ असताना, बस त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडकली आणि परिणामी प्रकाश यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि श्यामला बससमोर फेकल्याने ते रस्त्यावर पडले. तर भरधाव वेगात असलेल्या बसच्या मागील टायरखाली श्यामला चिरडली गेली, तर प्रकाश किरकोळ जखमी झाला.