विजय मल्ल्या 'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर, मल्ल्याच्या संपत्तीवर जप्तीचे ED चे मार्ग मोकळे
विजय मल्ल्या फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित झाल्याने आता ईडीला त्याच्या मालमत्त्वेचर कारवाई आणि जप्ती करण्याचे अधिकार मिळाले आहेत.
Vijay Mallya Fugitive Economic Offender Declaration Case: भारतीय बँकांचे सुमारे 9000 कोटी रुपये बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्या (Vijay Mallya) या घोटाळेबाजाराच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. आज मुंबईच्या कोर्टामध्ये विजय मल्ल्या 'फरार आर्थिक गुन्हेगार'(Fugitive Economic Offender) असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. स्पेशल प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऐक्ट कोर्ट (Special PMLA Court) ने हा निकाल दिला आहे. विजय मल्ल्या फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित झाल्याने आता ईडीला त्याच्या मालमत्त्वेचर कारवाई आणि जप्ती करण्याचे अधिकार मिळाले आहेत. विजय माल्ल्या यांना UK High Court चा दणका, लंडनच्या आलिशान घरातूनही बेघर होणार माल्ल्या
केंद्र सरकारने घोटाळेबाजांवर वचक ठेवण्यासाठी फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 आणला होता. अनेकदा घोटाळेबाज परदेशात पळून जाऊन न्यायालयाची कारवाई टाळण्याचा, त्यामध्ये दिरंगाई करण्याचा प्रयत्न करतात. परिणामी संबंधित राष्ट्रांकडून प्रत्यार्पणसाठी मागणी करून पुढील कारवाई केली जाते. ही प्रक्रिया खूपच वेळखाऊ आहे. म्हणूनच जर भारतामध्ये फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 आणला आहे.
सध्या विजय मल्ल्या लंडनमध्ये आहेत. त्याच्या लंडनमधील मालमत्तेवर जप्तीची परवानगी मिळाली असून सध्या भारताकडे त्यांचे प्रत्यार्पण करण्याबाबत कारवाई सुरु आहे.