Solapur Shocker: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापूरातही 22 वर्षीय गर्भवतीची सासर च्या जाचाला कंटाळून आत्महत्या
आशाराणीचा पती वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो. पहिली मुलगी झाल्यानेही आशाराणीला सासरी त्रास होता. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात देखील करण्यात आला आहे.
पुरोगामी महाराष्ट्रात आजही हुंडाबळीची समोर येणारी प्रकरणं वेदनादायी आहेत. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता राज्यातील अनेक हुंडाबळीची प्रकरणं पुढे येत आहेत. सध्या वैष्णवीचं प्रकरण ताजं असताना सोलापूर मध्येही एका विवाहित मुलीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे. यामुळे मृत मुलीच्या वडिलांनी सासरी मुलीला पैशाच्या हव्यासासाठी आणि चारचाकी साठी त्रास दिला जात असल्याची तक्रार केली आहे. मोहोळ तालुक्यातील ही चिंचोलीकाटी येथील आत्महत्या आहे. या हुंडाबळी प्रकरणामध्ये मृत तरूणीच्या पती सह सासू-सासरे यांच्या विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आशाराणी पवन भोसले या 22 वर्षीय मुलीने सासरी छळ होत असल्याने आत्महत्या केली आहे. आशाराणीला 3 वर्षांची मुलगी आहे तर दुसर्यांदा ती गर्भवती देखील होती. 2019 मध्ये तिचा विवाह पवन भोसले सोबत झाला होता. या तरूणीच्या वडिलांनी केलेल्या फिर्यादीमध्ये तिला सासरी पैसे आणि गाडी वरून छळलं जात असल्याचं नमूद केले आहे. मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नक्की वाचा: Pune Shocker: पुण्यात नणंद आणि तिच्या मुलांच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या; गुन्हा दाखल, तपास सुरु .
सध्या पती, सासू-सासरे तिघेही फरार आहेत. त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आशाराणीचा मृतदेह घेणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी आशाराणीच्या मृत्यूवरून संशय व्यक्त करत पोलिस स्टेशन मध्ये ठिय्या मांडलं आहे. नक्की वाचा: वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 'नववधूंना' केलं हे आवाहन; हुंडा, कौटुंबिक अत्याचारामध्ये लक्षात ठेवा या गोष्टी .
आशाराणीचा पती वॉशिंग सेंटरमध्ये काम करतो. पहिली मुलगी झाल्यानेही आशाराणीला सासरी त्रास होता. यापूर्वी तिचा एकदा गर्भपात देखील करण्यात आला आहे. सासरी आशाराणीला 'तूला स्वयंपाक येत नाही, पतीचा मान राखत नाही. चारचाकी साठी सासरहून पैसे आण. अशा अनेक गोष्टींवरून मानसिक, शारिरीक त्रास दिला जात असल्याचाही आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
Women and Child Helpline Numbers: Childline India – 1098; Missing Child and Women – 1094; Women’s Helpline – 181; National Commission for Women Helpline – 112; National Commission for Women Helpline Against Violence – 7827170170; Police Women and Senior Citizen Helpline – 1091/1291.
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2025 09:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

