सोलापूर: खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

जयसिद्धेश्वर शिवाचार्य (Jai Siddheshwar Swami) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जयसिद्धेश्वर यांच्यावर लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अक्कलकोट येथील नायब तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Solapurs bjp mp Jaisiddheshwar Mahaswamijis (PC - Twitter)

सोलापूर सत्र न्यायालयाने खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य (Jai Siddheshwar Swami) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre Arrest Bail Application) फेटाळला आहे. जयसिद्धेश्वर यांच्यावर लोकसभा निवडणुकीत बोगस जात प्रमाणपत्र (Caste Certificate) सादर केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अक्कलकोट येथील नायब तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयसिद्धेश्व यांच्यावर सोलापुर पोलिस ठाण्यात कलम 420, 467, 468, 471 आणि 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिद्धेश्वर स्वामी रविवारी उच्च न्यायालय बंद असल्याने सोमवारी उच्च न्यायालयात या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (वाचा - खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये कपात किंवा त्यांना नोकरीवरून काढू नका, राज्य सरकारची सुचना; 21 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)

खासदार जयसिदेश्वर महास्वामींच्या बेड जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तसेच तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार डॉ . जयसिदेश्वर शिवाचार्यांनी सादर केलेला बेड जंगम जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार प्रमोद गायकवाड यांनी केली होती. त्यामुळे जयसिदेश्वर यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातील भाजप पक्षाचे खासदार आहेत. जयसिद्धेश्वर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांनाचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif