Solapur Accident: भरधाव स्कॉर्पिओ गाडी झाडावर आदळून अपघात; तीन ठार, एक गंभीर जखमी
सोलापूर-विजयपुरा मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास औराद येथील वकिल वस्तीनजीक ही घटना घडली.
भरधाव स्कॉर्पीओ गाडी रस्त्यालगतच्या झाडावर आदळून घडलेल्या भीषण अपघातात (Solapur Accident) तिघांचा मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सोलापूर-विजयपुरा मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास औराद येथील वकिल वस्तीनजीक ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, अपघातात मृत्यू झालेले तिघेही मंडप आणि लायटींग कॉन्ट्रॅक्टर होते. दक्षिण सोलापूर तालुक्याती औराद येथे त्यांना एक काम मिळाले होते. हे काम अटोपून हे सर्वजण घराकडे परतत होते. दरम्यान, हा अपघात झाला.
विजयपूर मार्गावर असलेल्या तेरा मैल या ठिकाणी एम. एच. 13 झेड. 9909 क्रमांकाची स्कार्पीओ भरधाव वेगाने येत होती. या वाहनाचा वेग इतका अधिक होता की, अपघातात गाडीचा चुराडा तर झालाच. परंतू, गाडीत असलेल्या तिघांचा मृत्यूही झाला. परिसरातील नागरिकांनी अपघातग्रस्तांना नजिकच्या दवाखाण्यात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. (हेही वाचा, Mumbai-Pune Expressway- मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच ठार, पाच जखमी)
वाहन चालवताना वेग मर्यादेत असणे नेहमीच आवश्यक असते. मात्र अनेकदा चालक त्याकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा चालकास पुरेसे प्रशिक्षण अथवा कामाचा अनुभव नसणे. पुरेशी विश्रांती मिळाली नसणे. वाहनाची देखभाल काळजीपूर्वक झालेली नसणे यांसारखी एक ना अनेक कारणे अपघाताला जबाबदार असतात. कधी कधी समोरच्या अथवा इतर वाहन चालकामुळेही अपघाताच्या घटना घडतात.