भयंकर! शाळेच्या Midday Meal मध्ये आढळला साप, पालकांकडून संताप व्यक्त

मात्र अलीकडल्या काळात या मध्यान्ह भोजनाच्या बाबत काही घोटाळे आणि धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात अजून एक भर पडली असून चक्क मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत साप शिवला गेल्याची घटना समोर आली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

राज्यातील ग्रामीण विभागीतील विद्यार्थ्यांना शाळेत मध्यान्ह भोजन (Midday Meal) दिले जाते. मात्र अलीकडल्या काळात या मध्यान्ह भोजनाच्या बाबत काही घोटाळे आणि धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यात अजून एक भर पडली असून चक्क मध्यान्ह भोजनाच्या खिचडीत साप शिवला गेल्याची घटना समोर आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदेड येथील हदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत खिचडीत साप आढळ्याची धक्कादयक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील शिक्षण विभागाचे पथक घटनास्थळी पोहचून चौकशी करत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत बुधवारी (30 जानेवारी) विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात आले होते. त्यावेळी शालळेतील सर्व विद्यार्थी भोजनाला बसले असता एका विद्यार्थ्याच्या ताटातील खिचडीत मृतावस्थेतील साप आढळून आला.

या प्रकरणी शाळेतील शिक्षकांनी एकाही विद्यार्थ्याला ही खिचडी खाण्यास मनाई केली. तसेच खिचडीची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. मात्रअद्याप कोणत्याही विद्यार्थाला काही झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आरोपींविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी केली जात आहे.