Smriti Irani Slams Maharashtra Govt: 'महाराष्ट्र सरकार संविधानाची खिल्ली उडवत आहे' नारायण राणे प्रकरणावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया
ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले असून राज्यात शिवसेना विरुद्ध राणे (Shiv Sena Vs Rane) असे वातावरण पाहायला मिळाले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सोमवारी जनआशिर्वाद (Jan Ashirwad Yatra) दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत अशोभनीय शब्दाचा उच्चार केला होता. ज्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापले असून राज्यात शिवसेना विरुद्ध राणे (Shiv Sena Vs Rane) असे वातावरण पाहायला मिळाले आहे. याप्रकरणी नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करीत महाड न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नारायण राणे यांना जामीन मंजूर केली. दरम्यान, नारायण राणे यांच्या प्रकरणावर अनेकांची प्रतिक्रिया आली आहे. याचपार्श्वभूमीवर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनीही आपली प्रतिक्रिया देत महाराष्ट्र सरकारवर (Maharashtra Government) टीका केली आहे.
नारायण राणे प्रकरणावर स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की, "महाराष्ट्र सरकार कायदा आणि भारतीय संविधानाची खिल्ली उडवत आहेत. हे अत्यंत दुःखद आहे, महाराष्ट्रात यापुढे मुक्त भाषण आणि लोकशाही मिरवणूक देखील थांबवल्या जातील", अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. हे देखील वाचा- Narayan Rane's Reaction on Arrest: नारायण राणे यांनी मानले सहकाऱ्यांचे आभार
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आक्षेपार्ह विधान केल्यानंतर नारायण राणे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर 24 ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना 24 ऑगस्टला उशिरा रात्री जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्याचे राजकारणात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत.
नुकतीच नारायण राणे यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी त्यांनी शिवेसनेवर जोरदार टीका केली आहे. तसेच जन आशीर्वाद यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. गेल्या सात वर्षात त्यांनी केलेली काम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.