IPL Auction 2025 Live

Monsoon 2019 Updates: मुंबईकरांनो! पुढील काही दिवस दमदार पावसासाठी सज्ज रहा : स्कायमेटचा अंदाज

केरळच्या किनारपट्टीवर सक्रिय झालेला पाऊस आता कोकण आणि मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे.

Image used for representational purpose only | (Photo Credits: PTI)

Maharashtra Monsoon Predictions: मुंबईमध्ये सध्या ऊन -पावसाचा खेळ सुरू आहे. अचानक वातावरणामध्ये आर्द्रता वाढत असल्याने अनेकांना पावसाऐवजी घामाच्या धारांमध्ये भिजावं लागत आहे. मात्र स्कायमेट ने वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात मुंबईसह महराष्ट्र, कोकण परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 23 जुलै पासून मुंबईत पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. केरळच्या किनारपट्टीवर सक्रिय झालेला पाऊस आता कोकण आणि मुंबईमध्ये पुन्हा मुसळधार कोसळण्याची शक्यता आहे.

स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तवणार्‍या संस्थेकडून 25,26,27,28 या चार दिवसात दमदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 25 जुलै पासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. यामध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पावसाचा जोर 26 जुलैला आणखी वाढेल. तर 27 आणि 28 जुलै दिवशी हा पाऊस जोरदार कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान पाणी साचण्याचं, ट्राफिक जाम होण्याचं प्रमाण अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Western Railway Monsoon Helpdesk: दादर, मुंबई सेंट्रल सह 7 रेल्वे स्थानकांवर पश्चिम रेल्वे देणार मुंबईकरांना मोफत छत्री आणि व्हिलचेअर ची सोय

 

यंदाच्या आठवड्यात कसा असेल पाऊस? 

यंदाच्या आठवड्यात पावसाची शक्यता असल्याने पेरणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्येही पाऊस हजेरी देण्याची शक्यता आहे.