Harishchandragad News: हरिश्चंद्र गडावर पर्यटक रस्ता चुकले, जंगलात अडकलेल्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

पर्यटक रस्ता चुकल्यामुळे जंगलात थांबले रात्र भर थंडी असल्यामुळे एका पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Harishchandragad News:  राज्यात गेल्या काही दिवसांपासून  अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने पर्यटक गडकिल्ल्यांवर आंनद लुटण्यासाठी  ट्रेकिंगला जात आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातील किल्ल्यांवर मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान पुण्यातील पर्यटक सुट्टीच्या दिवशी हरिश्चंद्रगडावर गेलेल्या सोबत धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. हरिश्चंद्रगडावर गेलेल्या सहा पर्यटकांचा  अचानाक रस्ता चुकल्याने पर्यटकांना संपूर्ण रात्र डोंगराच्या कपारीवर बसून काढावी लागली आहे. दरम्यान रात्री एक धक्कादायक प्रकार घडला.  दाट धुकं आणि थंडीमुळं एका पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे मित्र परिवार वर्षाविहाराचा आंनद लुटण्यासाठी  हरिश्चंद्रगडावर आले होते. गडाचं अंतर खुप मोठं असल्याने त्यांना प्रवास पूर्ण करण्यासाठी दुपारचे तीन वाजले. संध्याकाळच्या दरम्यान त्यांनी तोलार खिंड चढायला सुरुवात केली.  दरम्यान त्याचा रस्ता चुकल्यामुळे त्यांना समजले. अचानक मुसळधार पाऊस सुरु झाल्याने रस्ता भरकटले. त्यामुळं सर्व पर्यटक डोंगराच्या कपारीचा आसरा घेतला. रात्र तिथं घालवायची असं ठरवलं.

मुसळधार पावसाने थंडगार वारा रात्रभर होता. दरम्यान रात्रघर थंडीने काकडल्याने अनित गिते नावाच्या तरुणाचा दुदैवी मृत्यू झाला. पोलीसांना ही माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत घडनास्थळी धाव घेतला.  पोलीसांनी अनित गितेचा मृतदेह ताब्यात घेतला. आणि या घटनेचा पंचनामा करण्यात आला. परिसरातील स्थानिकांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतला. रेस्कू टीमच्या मदतीने बाकीच्या पर्यटकांना वाचवण्यात यश आले. यातील काही पर्यटकांची अवस्था गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळं आता हरिश्चंद्रगडावर जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement