सिद्धिविनायक मंदिरा मध्ये दर्शनाचं आमिष दाखवून फसवणूक करणार्यांपासून सावधान; आदेश बांदेकरांनी केले 'हे' आवाहन
सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी एका व्हिडिओ पोस्ट द्वारा भाविकांना सोशल मीडीयातील खोडसाळ वृत्ताकडे लक्ष न देण्याचं आवाहन केले आहे.
मुंबई (Mumbai) मधील प्रभादेवी (Prabhadevi) येथील सिद्धिविनायक मंदिर (Siddhivinayak Mandir) हे अनेकांचं श्रद्धास्थान आहे. देशा-परदेशातून भाविक येथे दर्शनाला येतात. मात्र भाविकांच्या श्रद्धेशी खेळ करत काही लोकांकडून सोशल मीडियात 'या क्रमांकावर आम्हाला संपर्क साधा आम्ही गणपतीचं दर्शन करुन देऊ', अशा पोस्ट करून भाविकांची फसगत करण्याचा डाव आखला आहे. पण अशाप्रकारे दर्शन घडवून देणार्यांवर विश्वास ठेवू नका असे मंदिर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी एका व्हिडिओ पोस्ट द्वारा भाविकांना सोशल मीडीयातील खोडसाळ वृत्ताकडे लक्ष न देण्याचं आवाहन केले आहे. तसेच कुणाची फसवणूक झाली असेल तर भाविकांना मंदिर प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात आले आहे.हे देखील नक्की वाचा: Aadesh Bandekar यांच्या नावाचा वापर करत फसवणूकीचे प्रकार समोर; बांदेकरांनी चाहत्यांना केलं 'हे' आवाहन .
पहा आदेश बांदेकरांचं आवाहन
कोरोना संकट काळात जेव्हा मंदिरं उघडली तेव्हा सिद्धिविनायक मंदिरात क्यूआर कोड च्या माध्यमातून दिवसाला मर्यादित भाविकांनाच प्रवेश दिला जात होता. पण हळूहळू नियम शिथिल झाले आणि आता सार्या भक्तांना गणरायाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरं खुलं करण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासाठी कोणत्याही पूर्व परवानगीची गरज नाही.