Nashik Murder: धक्कादायक! नाशिक येथील इंदिरानगर येथे गॅरेज कामगाराकडून मालकाची हत्या; 2 जणांना अटक

गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या मालकाची हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरूवारी रात्री नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इंदिरानगर (Indiranagar) परिसरात घडली आहे.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

गॅरेजमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्या मालकाची हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरूवारी रात्री नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इंदिरानगर (Indiranagar) परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत व्यक्ती गॅरेजमध्ये एकटे असल्याचे डाव साधत आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ज्यात ते गंभीर जखमी झाले. ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.

रोशन कोटकर असे आरोपीचे नाव आहे. रोशन हा वडाळा पाथर्डी रस्त्यावरील श्रीजी प्लाझा अपार्टमेंट शेजारी रामचंद्र निषाद यांचे गुरुपकृपा नावाचे गॅरेजमध्ये कामाला आहे. रामचंद्र निषाद आणि रोशन यांच्यात किरकोळ वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरूवारी रात्री निषाद हे गॅरेजमध्ये एकटेच असल्याचे पाहून रोशन आणि त्यांचा साथिदार महेश लभडे यांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. ज्यात ते गंभीर जखमी झाले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती होताच इंदिरानगर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी रोशन यानेच त्याचे मालक निषाद यांची हत्या केली असल्याचे पोलिसांना संशय आला. त्यानुसार, पोलिसांनी रोशन आणि महेश लभडे याला येवला येथून ताब्यात घेतले. दरम्यान, पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही खून केल्याची कबुली दिली, अशी माहिती टीव्ही9ने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- Aurangabad Rape: लग्नाचे आमिष दाखवत एका 19 वर्षीय तरुणीवर चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार; आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रोशन आणि महेश या दोघांवरही खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मालकाची हत्या केल्यानंतर त्यांनी गॅरेजमधील वर्णा कारदेखील पळवून नेली होती. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement