Shocking! हिंदू पत्नीचा बुरखा घालण्यास नकार, मुस्लीम पतीने केली गळा चिरून हत्या; Mumbai मधील धक्कादायक घटना

सहा महिने ते वेगळे राहत होते व या दरम्यान त्यांचे फोनवर बोलणे चालू असायचे. मात्र, त्यावेळीही इक्बाल तिच्यावर मुस्लिम परंपरा पाळण्यासाठी दबाव आणत होते. रुपाली ही इक्बालची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीला मूलबाळ नसल्याने त्याने तिला घटस्फोट दिला होता.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

बुरखा (Burqa) आणि हिजाब संदर्भात अनेक देशांमध्ये गदारोळ माजला असताना, या संदर्भात मुंबईतून (Mumbai) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इकबाल महमूद शेख नावाच्या व्यक्तीने हिंदू पत्नी रुपालीचा गळा चिरून खून केला, कारण ती मुस्लिम प्रथा पाळत नव्हती आणि तिने बुरखा घालण्यास नकार दिला. रुपालीने इक्बालसोबत आंतरधर्मीय विवाह केला होता, मात्र ती इक्बालच्या मुस्लीम प्रथा पाळण्याच्या बळजबरीला कंटाळून घटस्फोटाची मागणी करत होती. घटस्फोटापूर्वीच आरोपीने तिची निर्घृण हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आरोपी इकबाल शेख याने पत्नी रुपाली हिची चाकूने हत्या केली. मुंबईतील चेंबूर परिसरात ही घटना घडली आहे. आरोपी इक्बालला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. रुपालीचे तीन वर्षांपूर्वी इक्बाल शेखसोबत प्रेमविवाह झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर दोघेही चेंबूर परिसरात असलेल्या इक्बालच्या घरी राहत होते.

रुपाली हिंदू असल्याने आणि लग्नानंतरही ती मुस्लिम रितीरिवाज पाळत नसल्याने इक्बाल आणि त्याचे कुटुंबीय तिच्यावर नाराज होते. इक्बालचे कुटुंब रुपालीवर बुरखा घालण्यासाठी दबाव आणत होते, पण ते ती मान्य करत नव्हती. यावरून वाद झाला होता व त्यानंतर रुपाली आणि इक्बाल वेगळे राहू लागले. या जोडप्याला एक मुलगाही आहे.

सहा महिने ते वेगळे राहत होते व या दरम्यान त्यांचे फोनवर बोलणे चालू असायचे. मात्र, त्यावेळीही इक्बाल तिच्यावर मुस्लिम परंपरा पाळण्यासाठी दबाव आणत होते. रुपाली ही इक्बालची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीला मूलबाळ नसल्याने त्याने तिला घटस्फोट दिला होता. आरोपी इकबाल शेख याने रुपालीला सोमवारी सायंकाळी चेंबूर परिसरातील पीएल लोखंडे मार्गावरील नागेवाडी येथे भेटण्यासाठी बोलावले. (हेही वाचा: स्कूल बस दरीत कोसळली, 4 विद्यार्थी जखमी; पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घटना)

यादरम्यान बुरखा आणि इतर गोष्टींवरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावर रुपालीने घटस्फोटाच्या मागणीचा पुनरुच्चार केला. वाद वाढत गेल्याने इक्बालने खिशातून चाकू काढून रुपालीच्या गळ्यावर वार करून पळ काढला. रुपालीचा जागीच मृत्यू झाला. उपस्थितांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement