Change Name Of Sambhaji Bidi: संभाजी बिडी धुम्रपान उत्पादनाविरोधात शिवभक्त आक्रमक! बिडीचे नाव बदला अन्यथा आंदोलन छेडणार; शिवधर्म फाउंडेशनचा इशारा

परंतु, या उत्पादनाच्या नावावरून शिवभक्त आक्रमक झाले आहेत. संभाजी बिडीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने हे नाव बदलावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनने (Shivdharma Foundation) दिला आहे.

Sambhaji Bidi (PC - youtube)

Change Name Of Sambhaji Bidi: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने 'संभाजी बिडी' (Sambhaji Bidi) या नावाने धूम्रपान उत्पादन करण्यात येत आहे. परंतु, या उत्पादनाच्या नावावरून शिवभक्त आक्रमक झाले आहेत. संभाजी बिडीचे उत्पादन करणाऱ्या कंपनीने हे नाव बदलावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवधर्म फाउंडेशनने (Shivdharma Foundation) दिला आहे.

धुम्रपान उत्पादनाला संभाजी महाराजांचे नाव देणे आणि त्याची विक्री करणं हा संभाजी महाराजांचा अपमान आहे. त्यामुळे संभाजी बिडीचे नाव आता बदलण्यात यावं, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनने केली आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून संभाजी बिडी या नावाने धूम्रपान उत्पादन केले जात आहे. हे अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे कंपनीने तात्काळ हे नाव बदलावे, असं आवाहन शिवधर्म फाउंडेशनने केले आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra Police: गेल्या 24 तासात महाराष्ट्र पोलीस दलातील 120 कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण, तर एकाचा मृत्यू)

दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बेळगाव जिल्ह्यातील निपाणी जवळ असलेल्या कर्नाटकातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला होतो. त्यामुळे मराठी भाषिकांनी संताप व्यक्त करत आंदोलन छेडले होते. या प्रकारानंतर शिवभक्तांनी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केलं होतं.

बिडीवर छत्रपती संभाजी महाराज यांचं चित्रदेखील आहे. त्यामुळे त्यांचा अवमान होतं आहे. हा अवमान सहन केला जाणार नाही. यासाठी या बिडी उत्पादन करणाऱ्या कंपनीने नाव बदलून नवीन उत्पादन करावे, अशी मागणी शिवधर्म फाउंडेशनकडून करण्यात आली आहे. जर संबंधीत कंपनीने नाव बदलले नाही, तर 1 सप्टेंबरपासून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवधर्म फाउंडेशनने दिला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif