Shiv Sena (UBT) Campaign Ad: शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये उल्लू वेब सिरीजमधील 'Porn Star' चा वापर? भाजप नेत्या Chitra Wagh यांचे आरोप, पुरावा म्हणून शेअर केला फोटो (Watch Video)

चित्रा वाघ म्हणाल्या, 'अदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड'च्या 'उबाटा'च्या ज्या जाहिराती आहेत, त्यामधील पात्र हा एक पॉर्न स्टार आहे. ठाकरे गट महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे.'

Shiv Sena (UBT) Campaign Ad: शिवसेना ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये उल्लू वेब सिरीजमधील 'Porn Star' चा वापर? भाजप नेत्या Chitra Wagh यांचे आरोप, पुरावा म्हणून शेअर केला फोटो (Watch Video)
chitra Wagh (Photo Credit - FB)

Shiv Sena (UBT) Lok Sabha Election 2024 Campaign Ad: उद्धव ठाकरे गटाच्या (UBT) जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर केला असल्याचा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. आज चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक 2024 च्या प्रचार जाहिरातीमध्ये पॉर्न स्टार असलेल्या अभिनेत्याने भूमिका केल्याचा आरोप करून वादाला तोंड फोडले. यावेळी महिलांचा अवमान करण्याची एकही संधी ठाकरे गट सोडत नाही, अशी टीका वाघ यांनी केली.

चित्रा वाघ म्हणाल्या, 'अदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड'च्या 'उबाटा'च्या ज्या जाहिराती आहेत, त्यामधील पात्र हा एक पॉर्न स्टार आहे. ठाकरे गट महाराष्ट्रामध्ये पब, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहे. हा पॉर्न स्टार जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार? आणि हाच व्यक्ती लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतोय. ही व्यक्ती ‘उल्लू’ ॲपवर मुलींसोबत घाणेरडे कृत्य करत आहे. अशा माणसाला घेऊन त्यांनी (ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली? तसेच ही जाहिरात कंपनी आणि उद्धव ठाकरे यांचे काही संबंध आहेत का? याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे.' (हेही वाचाManoj Jarange On BJP: महाराष्ट्रातल्या भाजपा नेत्यांमध्ये मराठा समाजाविषयी प्रचंड द्वेष - मनोज जरांगे)

पहा व्हिडिओ-

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 02, 2024 05:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).