Shiv Sena Symbol Controversy: शिवसेना पक्षचिन्ह वाद; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पार्टीची निवडणूक चिन्हं नेमकी कोणती?
केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णयही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला. परिणामी शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव (Shiv Sena Symbol Controversy) आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेले. त्यावरुन सुरु झाला पक्ष आणि चिन्हाचा वाद.
Uddhav Thackeray and Eknath Shinde Controversy: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उसताना पक्षात फूट पडली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन केलेला पक्ष फुटला. मराठी माणूस आणि उभ्या महाराष्ट्रासाठी ही चटका लावणारी गोष्ट होती. एकनाथ शिंदे यांनी आमदार आणि खासदारांच्या सहाय्याने पक्षात बंड केले. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णयही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेला. परिणामी शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव (Shiv Sena Symbol Controversy) आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे गेले. त्यावरुन सुरु झाला पक्ष आणि चिन्हाचा वाद.
उद्धव ठाकरे यांची मशाल
शिवसेना पक्षात बंड झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने सूचवल्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आयोगाकडे रितसर मागणी केली. त्यानूसार त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षनाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह मिळाले. उद्धव ठाकरे यांचे सहकारी आणि लोकसभा निवडणूक 2024 मधील सर्व उमेदवार सध्या मशाल याच चिन्हावर लढत आहेत. (हेही वाचा, NCP Party Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्ह वाद; शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचे नेमके चिन्ह कोणते? घ्या जाणून)
एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण
मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे गटाचा दावा मान्य करत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिला. त्यामुळे शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाले. लागलीच पक्षाच्या नेत्यांनी सर्व सोपस्कर पार पाडत शिंदे यांची पक्षाचा महानेता म्हणून निवड केली. त्यामुळे सध्या शिंदे यांचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढत आहेत.
महायुती विरुद्ध महाविकासआघाडी
उद्धव ठाकरे यांचा शिवसेना (UBT) पक्ष सध्या महाविकासआघाडीमध्ये सहभागी असून राष्ट्रीय पातळीवर विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीचा घटक आहे. राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जनतेतून सहानुभूती पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला, एकनाथ शिंदे यांचा निवडणूक आयोगाने बहाल केलेला शिवसेना पक्ष महायुतीचा घटक आहे. तसेच, तो राष्ट्रीय पातळीवर भाजप प्रणित एनडीए आघाडीमध्ये सहभागी आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षात पडेलेल्या फुटीनंतर ठाकरे परिवार आणि शिवसेनेला माणणाऱ्या मतदारांमध्येही फूट पडल्याचे दिसते. परिणामी पारंपरीक धनुष्यबाण चिन्हाचा मतदार सध्यातरी गोंधळल्याचे चित्र आहे. त्याला धनुष्यबाण की मशाल यात नेमकी भूमिका घेणे काहीसे कठीण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात लोकसभा निवडणुकीच्या एकूण टप्प्यांपैकी चार टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. शेवटच्या टप्प्याचे मतदान येत्या 20 मे रोजी होऊ घातले आहे. परिणामी मतदारांच्या मनात काय हे 4 मेच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.