Shinde Group vs Thackeray Group: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 8 राज्यांच्या शिवसेना प्रदेशप्रमुखांनी दिला शिंदे गटाला पाठिंबा
आता 8 राज्यांच्या शिवसेना प्रदेशप्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
Shinde Group vs Thackeray Group: गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसत आहे. राज्यात शिवसेनेचे दोन गटात विभाजन झालं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वाला नकार देऊन 40 शिवसेना आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पाठींबा दिला आहे. तसेच शिवसेनेच्या 12 खासदारांनी एकनाथ शिंदें यांना साथ दिली आहे. याशिवाय राज्यभरातील अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. आता 8 राज्यांच्या शिवसेना प्रदेशप्रमुखांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
दिल्ली, उत्तरप्रदेश, बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, मणिपूर, मध्यप्रदेश, गोवा या आठ राज्यातील शिवसेना प्रदेशप्रमुखांनी शिंदे गटाला पाठींबा जाहीर केला आहे. शिंदे गटाच्या बैठकीला या 8 प्रदेशप्रमुखांनी हजेरी लावली. (हेही वाचा - Sharad Pawar On Foxconn: राज्याची यंत्रणा थंड पडली आहे का? फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर गेल्यानंर शरद पवार यांचा सवाल)
दरम्यान, राज्यात शिवसेना पक्षाचे दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगासमोर खरी शिवसेना कोणाची? असा वाद निर्माण झाला आहे. तथापी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने निवडणूक चिन्हं धनुष्यबाणावर दावा केला आहे. अशातचं आता महाराष्ट्राबाहेरील 8 राज्यातील प्रदेशप्रमुखांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारल्यामुळे शिंदे गटाची न्यायालयीन लढाई आणखी सोप्पी झाली आहे. मात्र, या सर्व घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
वास्तविक, एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन राज्यात भाजपसोबत महायुती सरकार स्थापन केलं आहे. अचानक झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेतील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. शिवसेनेचा खरा वारसदार कोण, हे निवडणूक आयोगाला ठरवू द्यावे, असं एकनाथ शिंदे म्हटलं होतं. शिंदे यांनी सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला होता.