अखेर ठरलं! अडीच अडीच वर्षांसाठी असणार भाजप आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री; वरूण सरदेसाई यांची माहिती

याबाबत युवासेना सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

उद्धव ठाकरे, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस (संग्रहित-संपादित प्रतिमा)

लोकसभा निवडणुकीत घवघवित यश मिळवण्यानंतर आता राज्यात तयारी सुरु झाली आहे ती विधानसेभेची (Assembly Election). विधानसभेसाठी भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) निम्म्या निम्म्या जागांवर निवडणुका लढवणार आहेत. आता या युतीने राज्यात अडीच अडीच वर्षांसाठी दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्री असेल असा निर्णय घेतला आहे. याबाबत युवासेना सचिव वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

नुकतीच उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांची एक महत्वाची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत अडीच अडीच वर्षांसाठी दोन्ही पक्षांचा मुख्यमंत्री असेल असा निर्णय घेतला गेला आहे. ही माहिती दिल्यानंतर पुढे आपल्या ट्विटमध्ये वरून सरदेसाई टोला लगावतात, ‘जे नेते या वाटाघाटीला हजर नव्हते त्यांनी आपल्या स्वार्थासाठी युतीत खोडा घालण्याचे काम करू नये.’ वरून यांच्या या ट्विटवर अद्याप बीजेपी किंवा शिवसेना यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि या ट्विटने महाराष्ट्रातील राजकारणात उलथ पालथ निर्माण केली आहे. (हेही वाचा: लवकरच मंत्रिमंडळ विस्तार, सध्या मात्र फेरबदल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांनी दिली माहिती)

दरम्यान, राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर पर्यंत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. 288 जागा असलेल्या राज्यात भाजपकडे 122 विधानसभा मतदारसंघ आहेत, तर शिवसेनाकडे 63, काँग्रेसजवळ 42 आणि एनसीपीकडे 41 जागा आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे मुनगंटीवार म्हणाले आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif