Shiv Sena on MNS and BJP: देवेंद्र फडणवीस 'मिष्टर इंडिया' तर राज ठाकरे 'भाजपचे उपवस्त्र', शिवसेनेचे जोरदार टीकास्त्र
या टीकेला शिवसेना मुखपत्र दैनिक सामनामधून ( Saamana Editorial) जोरदार प्रत्युत्तर (Shiv Sena on MNS and BJP) देण्यात आहे.
महाराष्ट्र दिनी आयोजित वेगवेगळ्या सभांतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (Shiv Sena) या पक्षांवर जोरदार टीका केली. या टीकेला शिवसेना मुखपत्र दैनिक सामनामधून ( Saamana Editorial) जोरदार प्रत्युत्तर (Shiv Sena on MNS and BJP) देण्यात आहे. हे प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा उल्लेख 'मिष्टर इंडिया' (Mishtar India) तर राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा उल्लेख 'भाजपचे महावस्त्र' (Mahavastra) असा करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील सभेतून राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला होता. तर मुंबई येथील बुस्टर डोस सभेतून देवेंद्र फडणीस यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला होता.
'तरच तुम्ही हिमतीचे' या मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवत म्हटले आहे की, महाराष्ट्र दिनी भारतीय जनता पक्ष व त्यांच्या उपवस्त्र पक्षाने सभा घेतल्या. दिशादर्शक असे प्रेरक विचार त्या सभेतून राज्याला मिळतील असे वाटले होते, पण मुख्य पक्ष व त्यांच्या उपवस्त्राने लाथा झाडण्याशिवाय काहीच केले नाही. त्यामुळे गदाधारी कोण आणि ‘गधा’धारी कोण हे महाराष्ट्र दिनी स्पष्ट झाले. भाजपाच्या बुस्टर डोस सभेत देवेंद्र फडणवीस हे शिवसेनेवर तुटून पडले, तर संभाजीनगरच्या सभेत त्यांचे उपवस्त्र श्री. शरद पवारांवर तुटून पडले. हे ठरवून झाले. त्यातून महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जनतेला काय मिळाले? उपवस्त्राला बुस्टर देण्याचे काम मुंबईतूनच सुरू होते. पण भाजपाससुद्धा बुस्टर डोसची गरज आहे. (हेही वाचा, Sanjay Raut On Devendra Fadnavis: बाबरी मशीदच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार, जुना व्हिडीओ ट्विट करत म्हणाले आता बोला...)
देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडत सामात म्हटले आहे की, बाबरीचा ढाचा या विषयावर आपले विरोधी पक्षनेते इतके बोलले की, जणू देशात आता कोणतेच विषय शिल्लक राहिलेले नाहीत. बाबरी कोसळली आहे व श्रीरामाचे मंदिर उभे राहिले आहे ही समस्त हिंदू जनांसाठी अभिमानाची बाब आहे, पण आता देशात सगळ्यांना सुखी ठेवणारे ‘रामराज्य’ आणायला हवे असे या लोकांना का वाटत नाही? फडणवीस म्हणतात, ‘बाबरी ढांचा पाडताना एकही शिवसेना नेता अयोध्येत नव्हता. तो ढांचा पाडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय, मी तो ढांचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो!’ आता फडणवीस म्हणतात, म्हणजे तेथे ते असणारच, पण सीबीआयच्या विशेष न्यायालयातील आरोपपत्रात त्यांचे नाव कोठेच दिसत नाही. शिवसेनेचे अनेक नेते व शिवसैनिकांची नावे बाबरी प्रकरणाच्या आरोपपत्रात आहेत. त्यामुळे फडणवीस हे ‘मिस्टर इंडिया’ बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारीत होते काय? याचा गुप्त तपास नव्याने करावा लागेल. बाबरी ढांचा कोणी पाडला याबाबत अधिक माहिती महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांच्याकडून घ्यायला हवी. भंडारी आज हयात नाहीत, पण ६ डिसेंबरला दुपारी चार वाजताच भंडारी यांनी भाजपाच्या वतीने स्पष्ट केले की, ‘‘बाबरी पाडण्यात भाजपाचा हात नसून हे कार्य शिवसैनिकांनी केले असावे.’’ भंडारी यांचे हे वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे होते, असेही शिवसेनेने म्हटले आहे.