Gold- Silver Price Today: महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने-चांदी दर घ्या जाणून
Gold- Silver Price Today: सोने, चांदी दरांकडे सर्वसामान्यांसह अनेक गुंतवणूकदार आणि गर्भश्रीमंतांचेही लक्ष लागून राहिलेले असते. सोने चांदी दरात प्रतिदिन बदल संभवतात. त्यामुळे या दरांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. महाराष्ट्र आणि देशभरात प्रदेशानुसार या किमती सातत्याने विविध कर अंतर्भूत झाल्याने बदलत असतात.
Gold- Silver Price Today: सोने, चांदी दरांकडे सर्वसामान्यांसह अनेक गुंतवणूकदार आणि गर्भश्रीमंतांचेही लक्ष लागून राहिलेले असते. सोने चांदी दरात प्रतिदिन बदल संभवतात. त्यामुळे या दरांकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. महाराष्ट्र आणि देशभरात प्रदेशानुसार या किमती सातत्याने विविध कर अंतर्भूत झाल्याने बदलत असतात. गुड रिटर्न्स वेबसाईट नेहमी सोने, चांदी दरांची माहिती देते. त्यानुसार 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 49,150 रुपये सांगितली जात आहे. भारतात सोने 22 आणि 24 कॅरेट या गुणवत्तेनुसार विकले जाते. जाणून घ्या महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील सोने-चांदी दर.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांती सोने चांदी दर
मुंबई
22 कॅरेट- 49,150 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 53,620 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
पुणे
22 कॅरेट- 49,180 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 53,650 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
नागपूर
22 कॅरेट- 49, 810 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
24 कॅरेट- 53,650 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
चांदी- 783 रुपये (प्रति 10 ग्रॅम)
(टीप- वरील सर्व दर गुड रिटर्न्स बेवसाईटवर दिलेल्या माहितीनुसार)
वर देण्यात आलेले सोने, चांदी दर हे केवळ सूचक आहेत. त्यात GST, TST यांसारख्या दरांचा समावेश नाही. सोने, चांदी यांचे मूळ दर वेगळे असतात. त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्क लागल्याने राज्य आणि प्रांतवार या दरांमध्ये तफावत आढळते. विविध राज्यांमध्ये उत्पादन शुल्क वेगवेगळे असल्याने राज्यनिहाय सोने, चांदी दरात फरक असू शकतो. कधी हा फरक अधिक असतो कधी कमी. त्यातच जर तुम्ही सोने, चांदी दागिणे खरेदी करत असाल तर त्यावर घडणावळ म्हणजे मेकींग चार्जेसही लागतात. त्यामुळे अचूक दरांसाठी आपण आपल्या स्थानिक सोनार अथवा ज्वेलर्सशी संपर्क साधू शकता. (हेही वाचा, Gold Quality and Purity: 22 कॅरेट, 23 आणि 24 Carat सोने म्हणजे काय? तिन्हीमध्ये नेमका फरक काय?)
दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनतात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशन नुसार आपण केवळ एक मिस्ड कॉल देऊनही सोने, चांदी दर जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपणास 8955664433 या क्रमांकावर एक मिसकॉल द्यावा लागेल.ज्या फोन नंबरवरुन आपण मिस कॉल द्याल त्याच क्रमांकावर आपल्याला हे दर उपलब्ध होऊ शकतील.
(The above story first appeared on LatestLY on Apr 21, 2022 11:31 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

