Shiv Sena MLA Disqualification Case Verdict: एकनाथ शिंदे यांचे 16 आमदार पात्र, उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण

या निकालामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे सर्व दावे विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावले. तसेच, मूळ पक्षही त्यांचा नसल्याचे म्हटले आहे.

Shiv Sena MLA Disqualification Case Verdict | (Photo credit: archived, edited, representative image)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट हीच खरी शिवसेना (Shiv Sena) आहे. त्यामुळे मूळ शिवसेना पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हाच प्रदोत नेमत असतो. परिणामी भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांची प्रतोद म्हणून करण्यात आलेली निवड वैध आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar Verdict) यांनी शिवसेना अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालात म्हटले आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालपत्राचे वाचन राज्यविधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये विधानसभा अध्यक्षांनी केली. या निकालामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांचे सर्व दावे विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावले. तसेच, मूळ पक्षही त्यांचा नसल्याचे म्हटले आहे.

उद्धव ठाकरे गटाची आमदार अपात्रता याचिका फेटाळली

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने नेमलेला प्रतोदच वैध असल्याने या प्रतोदनी काढलेला व्हिपच वैध धरला जाईल, असे विधानसभा अध्यक्षांनी म्हटले. ही निवड निश्चित झाल्याने ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेची याचिकाही फेटाळून लावण्यात आली. परिणामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या पक्षाचे 16 आमदार वैध ठरले आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या निकालामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला आहे. अर्थात त्यांच्याकडे सर्वच्च न्यायालयात विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याचा मार्ग मोकळा आहे. (हेही वाचा, Rahul Narvekar Verdict about Shiv Sena: शिवसेना पक्ष कोणाचा? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला निर्णय)

शिवसेना- घटना क्रमांक एक: पक्ष आणि चिन्ह कोणाचे?

उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख असताना एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड केले. विशेष म्हणजे त्या वेळी शिवसेना सत्तेत होती आणि उद्धव ठाकरे हे स्वत: पक्षप्रमुख होते. असे असताना आपण स्वत:च सत्तेत असलेल्या पक्षात बंड करुन शिंदे यांनी समर्थक आमदारांसह सुरत गाठली आणि तिथून सुरु झाले एक राजकीय नाट्य. हे नाट्य पुढे इतके रंगले की, स्वत: एकनाथ शिंदे यांनी आपणास 42 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगित थेट शिवसेना पक्षावरच दावा ठोकला आणि वाद केंद्रीय निवडणूक आयोगात गेला. दरम्यान, आयोगानेही तातडीने निर्णय देत शिवसेना हे नाव आणि पक्ष धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना बहाल केले. यावरुन उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात गेला. ही याचिका अद्यापही प्रलंबीत आहे. (हेही वाचा, Shiv Sena MLA Disqualification Case: संविधानानुसार निकाल आल्यास 16आमदार अपात्र; आदित्य ठाकरे यांना विश्वास)

शिवसेना- घटना क्रमांक दोन: अपात्रता याचिका

एकनाथ शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. या दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड करते वेळी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांनी वेगवेगळे प्रतोद नेमले. त्यांनी पक्ष आमदारांना व्हीप बजावले. जे दोन्ही गटाच्या नेत्यांनी झुगालले आणि आपापल्या गटाचे व्हिप मानले. इथेच अपात्रतेची ठिणगी पडली आणि वाद सर्वोच्च न्यायालयात गेला. दोन्ही गटांनी परस्परविरोधी आमदारांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली. हीय याचिका सर्वोच्च न्यायालयात चालली. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीच बेकायदेशीर ठरवत रद्द केली. सहाजिकच गोगावले यांनी काढलेले व्हिप बाद ठरू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला. ज्यामुळे ही सुनावणी प्रदीर्घ काळ चालली. ज्याचा आज निकाल लागला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif