शिर्डी मधील साईबाबा यांच्या जन्मस्थळाचा वाद कोर्टात घेऊन जाण्याचा कृती समितीचा इशारा

कारण काही दिवसांपूर्वी पाथर्डी ग्रामस्थांनी साईबाबांचा जन्म पाथरी मध्ये झाल्याचे दावा केला होता. त्यावरुन शिर्डी बंदची हाक देण्यात आली होती.

Shirdi Sai Baba Mandir (Photo Credit: Wikimedia Commons )

शिर्डी (Shirdi) मधील साईबाब यांच्या जन्मस्थळाचा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे. कारण काही दिवसांपूर्वी पाथर्डी ग्रामस्थांनी साईबाबांचा जन्म पाथरी मध्ये झाल्याचे दावा केला होता. त्यावरुन शिर्डी बंदची हाक देण्यात आली होती. एवढेच नव्हे तर शिर्डीकर आणि पाथरी मध्ये एकेमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा करण्यात आले. मात्र अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करत हा वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पण आता पाथरीकरांनी आक्रमकतेचा पावित्रा घेतला असून कोर्टात जाण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

कृती समिती शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठातील जेष्ठ विधिज्ञांची भेट घेणार असून यबाबत पुढील रणनीती ठरवणार आहे. शिर्डी मधील साईबाबा यांचे जन्मस्थळ पाथरी असल्याचा दावा करण्यात आला. त्यावरुन वाद निर्माण झाल्याचे दिसून आले. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला शिर्डीच्या शिष्टमंडळाने घेतली.(मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून साईबाबा जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे; शिर्डी-पाथरी वादावर पडदा)

शिर्डी ग्रामस्थांनी जन्मस्थळा बाबत प्रतिक्रिया देताना, ‘साईसतचरित्र’मध्ये साईबाबांच्या जन्मस्थळाचा व वास्तव्याच्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख आहे. पण तरीही अनेक ठिकाणी साईंच्या जन्माचे दावे केले जातात इतकेच नव्हेत तर साईबाबांना या पूर्वी सुद्धा अनेकांनी धर्मात अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे असे देखील म्हटले होते. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद सभेत "ज्या ठिकाणी साईबाबांचा जन्म झाला, तिथे 100 कोटींची विकासकामांचा आरखडा तयार करण्यात आला असून लवकरच भूमिपूजन देखेल होईल" अशी घोषणा केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif