Sharad Pawar vs. Ajit Pawar: योग्य वेळ आली की, गौप्यस्फोट करणार; प्रफुल्ल पटेल यांचा सूचक इशारा
या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे, पण ते मी आत्ता देणार नाही. येणाऱ्या काळात गरज पडल्यास सर्व माहिती दिली जाईल, गौप्यस्फोट केला जाईल, असा सूचक इशारा प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या समर्थकांची एक बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.
प्रफुल्ल पटेल (Praful Patel) म्हणजे शरद पवार (Sharad Pawar) यांची सावली. प्रफुल्ल पटेल म्हणजे शरद पवार यांचा कट्टर समर्थक, असे समीकरण असताना सर्वांना एकच प्रश्न पडला असेल तेच पटेल इकडे कसे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत कसे? हा प्रश्न केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संबंध देशाला पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे आहे, पण ते मी आत्ता देणार नाही. येणाऱ्या काळात गरज पडल्यास सर्व माहिती दिली जाईल, गौप्यस्फोट केला जाईल, असा सूचक इशारा प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या समर्थकांची एक बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते.
प्रफुल्ल पटेल यांनी या वेळी विवध मुद्द्यांवर भाष्य केले. देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असेल तर विकास चांगला होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही यापूर्वी अनेक आघाड्या केल्या आहेत. भूमिका घेतल्या आहेत. 2019 मध्येही राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला. मध्येच भूमिका बदलली. नागालँडमध्येही तीच भूमिका घेतली. मग आता उघडपणे ती भूमिका घेतली तर बिघडले कुठे. आज भाजप मजबूत पक्ष आहे. त्याविरोधात आघाडी उभी करण्याचे काम सुरु आहे. आघाडी कोणाची तर काही पक्षांचे एक, दोन तर काही पक्षांचा एकही खासदार नाही, असे लोक भाजपविरोधात आघाडी करत आहेत, असा टोलाही पटेल यांनी लगावला. ( NCP Crisis: शरद पवार येत्या 8 जुलै रोजी घेणार पहिली सभा; ठिकाणही ठरलं, मातब्बर नेत्याला हादरा; घ्या जाणून)
दरम्यान, आजच मी सर्व काही बोलत नाही. योग्य वेळ आली की सर्व माहिती देणार आहे. ही माहिती सर्वांना मिळालायला पाहिजे. पण, ती आताच देणार नाही. आगामी काळात याबाबत बोलले जाईल. आज आपण अजित पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत. प्रफुल्ल पटेल म्हणून मी माझी सर्व ताकद अजित पवार यांच्या पाठीशी लावत आहे, असेही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले.