Lok Sabha Election 2019: मावळ मधील उमेदवार अद्याप जाहीर नाही: शरद पवार; पार्थ पवार यांच्या उमेदवारी बद्दल 'सस्पेंस' कायम
लोकसभा 2019 साठी अजून मावळचा उमेदवार जाहीर व्हायचंय असे शरद पवार म्हणाल्याने पार्थ पवारांच्या उमेदवारीवर आता 'सस्पेन्स' वाढला आहे.
शरद पवारांच्या घरातील चौथी पिढी यंदा 'पार्थ पवार' (Parth Pawar) यांच्या रूपाने लोकसभा निवडणूकीमध्ये उतरणार का? ही चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी माढा (Madha) मतदारसंघातून शरद पवार (Sharad Pawar) माघार घेऊन मावळमधून (Maval) पार्थ पवार लोकसभेच्या निवडणूकीमध्ये उतरणार अशी चर्चा रंगली असतानाच आज शरद पवारांनी 'गुगली' टाकली आहे. आज आगामी लोकसभेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कार्यकर्त्यांशी बोलत होते. त्यावेळेस अजून मावळचा उमेदवार जाहीर व्हायचंय असे शरद पवार म्हणाल्याने पार्थ पवारांच्या उमेदवारीवर आता 'सस्पेन्स' वाढला आहे. लोकसभा निवडणूक 2019: मावळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पार्थ पवार रिंगणात; शरद पवार यांनी दिले संकेत
शरद पवारांची गुगली
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार आणि जयंत पाटील कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. त्यावेळेस एका कार्यकर्त्याने आम्ही पार्थला 100% जिंकवून आणू असे म्हणताच शरद पवार यांनी त्याला बोलताना मध्येच तोडले आणि अजून मावळ मधील उमेदवार जाहीर झाला नसल्याचं म्हटलं आहे. शरद पवारांच्या या व्हिडिओ कॉन्फरसिंगमध्ये पार्थ पवार देखील कार्यकर्त्यांसोबत शिबीराला उपस्थित होते. काही वेळातच पार्थ या शिबिरातून बाहेर पडल्याची चर्चा आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ: पार्थ पवार यांच्यासमोर लोकसभा निवडणूक 2019 मध्ये विजयासाठी ही आहेत आव्हानं
पार्थ पवारांना मावळ येथुन उमेदवारी देताना शरद पवारांनी आगामी लोकसभा न लढवण्याचा विचार मांडला होता. पवारांच्या या निर्णयानंतर राजकीय क्षेत्रात, कार्यकत्यांमध्ये आणि खुद्द पवारांच्या घरातूनही संमिश्र प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली होती. अजित पवार यांचा मुलगा रोहित पवारांनी आजोबा शरद पवारांना त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, याबाबत एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. आदित्य ठाकरे लोकसभा निवडणूक 2019 लढवणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी केला मोठा खुलासा
शरद पवार आता काय निर्णय घेणार? पार्थ पवार लोकसभा निवडणूकीसाठी मैदानात उतरणार का? या बाबत राष्ट्रवादी कॉंग्रेससह अनेकांचं लक्ष लागले आहे.