Amit Shah Slams Sharad Pawar: भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रमुख शरद पवार आहेत; भाजपच्या पुणे अधिवेशनात अमित शहा यांची टीका
या देशात भ्रष्टाचाराचे संस्थानिकीकरण करणारे कोणी असेल तर ते शरद पवार आहेत. आता हे चालणार नाही. भाजपचे सरकार आल्यावर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो आणि शरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो.
Amit Shah Slams Sharad Pawar: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी रविवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली. अमित शहा यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचाऱ्यांचे प्रमुख म्हटले. तसेच पवार यांनी देशातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक स्वरूप दिल्याचा आरोपही अमित शहा यांनी केला. महाराष्ट्र भाजपच्या पुणे अधिवेशनाला संबोधित करताना अमित शहा यांनी ही घणाघाती टीका केली.
अमित शहा म्हणाले की, भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे प्रमुख शरद पवार आहेत. या देशात भ्रष्टाचाराचे संस्थानिकीकरण करणारे कोणी असेल तर ते शरद पवार आहेत. आता हे चालणार नाही. भाजपचे सरकार आल्यावर मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजतो आणि शरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो. शरद पवार राजकीय फायद्यासाठी मराठा आरक्षणाचा गैरफायदा घेत असल्याचा आरोपही यावेळी अमित शहा यांनी केला. (हेही वाचा -Amit Shah Pune Visit: विधानसभा निवडणुकीबाबत अमित शहांचा महाराष्ट्र दौरा; पुण्यात पक्षाच्या बैठकीला संबोधित करू शकतात)
अमित शहा यांचा काँग्रेसवर निशाणा -
तथापी, यावेळी अमित शहा यांनी काँग्रेस पक्षावरही ताशेरे ओढले आणि त्यांना खोटे बोलून निवडणुका जिंकायच्या असल्याचे सांगितले. आपण सत्तेत असताना आदिवासी आणि गरिबांसाठी काम का केले नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला. भाजपने समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला आहे. त्यांनी भाजपबद्दल खोटं पसरवलं की आरक्षण संपुष्टात येईल, पण 10 वर्षे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने पूर्ण बहुमतात राहून आरक्षणाला बळकटी दिली आहे, असा दावा यावेळी अमित शहा यांनी केला. दरम्यान, त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान केलेल्या 'खटा-खट' वक्तव्यावरून त्यांची खिल्ली उडवली. (हेही वाचा - India Allince Complaint to SEBI: लोकसभा निवडणूक निकालापूर्वी Amit Shah यांनी स्टॉक मार्केट बाबत केलेल्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडी करणार तक्रार)
पहा व्हिडिओ -
दरम्यान, अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 2019 पर्यंतच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाचे कौतुक केले आणि महायुती आणि केंद्र सरकारने केलेल्या विविध कामांची माहिती दिली. राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप दणदणीत विजय मिळवेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. भाजप केवळ दहा वर्षे नव्हे तर तीस वर्षे सत्तेत राहणार असल्याची भविष्यवाणीही यावेळी शहा यांनी केली.