IPL Auction 2025 Live

उदयनराजे भोसले यांच्या भाजपा पक्षप्रवेशानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया; 'कुणाच्या जाण्याने महाराष्ट्रात फरक पडणार नाही' म्हणत लगावला टोला

राष्ट्रवादी पक्षातून अनेक नेते भाजप (BJP) किंवा शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत आहेत. यामुळे राजकारणात संभ्रम निर्माण झाले आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केल्याचे उदयनराजे यांनी आरोप केले आहेत. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी खडेबोल सुनावले आहेत.

Sharad Pawar And udayanraje Bhosle (PTI)

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (Rashtrawadi Congress Party) पक्षाला मोठी गळती लागली आहे. राष्ट्रवादी पक्षातून अनेक नेते भाजप (BJP) किंवा शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत आहेत. यामुळे राजकारणात संभ्रम निर्माण झाले आहे. साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केल्याचे उदयनराजे यांनी आरोप केले आहेत. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी उदयनराजेंना खडेबोल सुनावले आहेत. महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केले होते. तसेच कोणाच्या जाण्याने महाराष्ट्रात (Maharastra) फरक पडणार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी उदयनराजे यांच्यावर टीका केली आहे.

राष्ट्रवादीच्या मुंबईतील (Mumbai) मेळाव्यात उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशावर बोलताना पवार म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या दिल्लीश्वरांच्या भेटीसाठी ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं."  हे देखील वाचा-राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाकिस्तानची प्रशंसा केल्याने शिवसेना पक्षाकडून टीका

शरद पवार यांचे ट्विट-

छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या दिल्ली शहराच्या भेटीसाठी ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. pic.twitter.com/PUjrSwC1sH

— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 15, 2019

राष्ट्रवादी काँग्रेसने अन्याय केल्याचे सांगत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला.

उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये केल्यासंदर्भात शरद पवार म्हणाले की, "महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते. मावळ्यांमध्ये स्वाभिमान निर्माण करून त्यांनी नवे रयतेचे राज्य निर्माण केलं. कुणाच्या जाण्यानं महाराष्ट्रात फरक पडणार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून, अठरापगड जातीच्या मावळ्यांना मधून पुन्हा नवा महाराष्ट्र घडवू या!" शरद पवार यांनी केलेल्या टिकेवर उदयनराजे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.