Kalyan Sex Racket Busted: कल्याण येथील सेक्स रॅकेटचा पदार्फाश; 4 बांगलादेशी महिलांना अटक

नांदीवलीतील एका इमारतीत देहविक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

प्रतिकात्मक फोटो. (Photo Credit: PTI)

कल्याण (Kalyan) पूर्वेतील नांदीवली परीसरात एका इमारतीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला आहे. ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत एका तरुणासह 4 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. नांदीवलीतील एका इमारतीत देहविक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या इमारतीमध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली असून याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

मोहन उर्फ सनातन सुरेंद्र बर्मन नामक दलालासह चार बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरिक्षक अशोक कडलक यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. याआधी देखील कल्याणमध्ये अनेक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी महिला येतात. काहींना नोकरीचे आमिष दाखवून येथे आणले जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. हे देखील वाचा- मुंबई: गोवंडीतील शिवाजी नगर भागातून ANC ने जप्त केले 33 लाख किंमतीचे ड्रग्स पिल्स, दोघांना केली अटक

याआधी पिपंरी चिंचवड येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा निगडी पोलिसांनी पर्दाफाश केला होता. या कारवाईत तीन मुलीची सुटका करण्यात होती. तर, स्पा सेंटरच्या मालकाला अटक करण्यात आली होती. ही कारवाई शनिवारी (12 डिसेंबर) दुपारी एकच्या सुमारास करण्यात आली. तसेच या कारवाईत 31 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.