Sex Racket Busted In Akola: अकोल्यात मसाज सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; डॉक्टरसह 4 जणांना अटक

याप्रकरणी एका डॉक्टरसह चार जणांना अटक करण्यात आली आहे.

sex racket | (Photo credit: archived, edited, representative image)

अकोल्यात (Akola) मसाज सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायाचा (Sex Racket Busted) अकोला दहशतवादी विरोधी पथकाने (ATS) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका डॉक्टरसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. अकोला शहरातील जवाहरनगर येथील रुग्णांना मसाज थेरपीद्वारे (Massage Therapy) आराम मिळावा, यासाठी तेजस्वी हेल्थ केअर सेंटर सुरु करण्यात आले होते. मात्र, याच हेल्थ केअर सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती होताच, नागरिकांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

प्रदीप देशमुख असे अटक करण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव आहे. देशमुख यांनी अकोला शहरातील जवाहरनगर येथे तेजस्वी हेल्थ केअर सुरु केले होते. मात्र, याच हेल्थ केअरमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती अकोला दहशतवाद विरोधी पथक प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. त्यानंतर विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचून बनावट ग्राहक तेथे पाठवला. त्यावेळी सदर ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्री पटली. त्यानंतर अकोला पोलिसांनी छापा टाकून देशमुखसह चार जणांना अटक केली आहे. हे देखील वाचा- Mumbai Police: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी सुरू केले 'मिशन बॉन्ड'; गुन्हेगारांना भरावा लागणार 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड

दरम्यान, मुंबईत दोन दिवसांपूर्वी एका उच्चभ्रू वेश्या व्यवसायचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हे वेश्या व्यवसाय बॉलिवूडचा एक कास्टिंग डायरेक्टर आणि सिनेमा निर्माता चालवत होता. सिनेमात काम मिळवण्याचे आमिष देऊन तो मॉडेल आणि अभिनेत्रींना वेश्या व्यवसायाच्या दलदलीत ढकलत होता. याप्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, देहव्‍यापारात अडकलेल्या 8 मॉडल्सला यातून मुक्त केले आहे.