सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू होणार, 15% वेतन वाढ मिळणार
तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन 15% वाढवला जाणार असल्याचा निर्णय राज्य मंत्री मंडाळाच्या आगामी बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू (Seventh Pay Commission) करण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन 15% वाढवला जाणार असल्याचा निर्णय राज्य मंत्री मंडाळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यातील 17 लाख कर्मचारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 4 ते 14 हजार रुपयांनी वाढ होणार आहे. प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 9 ते 14 हजार, तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 5 ते 8 हजार रुपयांनी वाढ करण्याची शक्यता आहे. मात्र बक्षी समितीचा अहवाल येण्यास विलंब झाला तरीसुद्धा 1 जानेवारी 2019 पासूनच सातवा वेतन आयोग लागू केला जाईल, असेही केसरकर यांनी सांगितले होते. दरम्यान, राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन किमान 21 हजार रुपये करावे अशी मागणी कपील पाटील यांनी केली होती. त्याला उत्तर देताना सातव्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन वीस हजारांहून अधिकच असेल असे केसरकर म्हणाले होते. ( हेही वाचा- Seventh Pay Commission: नववर्षात 'अच्छे दिन': 1 जानेवारी 2019 पासून राज्यात सातवा वेतन आयोग लागू होणार: राज्य सरकार)
सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग सुरु करण्यात येणार आहे. तर फेब्रुवारी महिन्यापासून पगारात वाढ होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी येणारे 2019 हे नवे वर्ष 'अच्छे दिन' दाखवणार आहे.