Trekking ban in Raigad: ट्रेकर्संसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय, रायगडवर ट्रेकींग बंद करण्याचे दिले आदेश

त्यामुळे रायगडावरिल ट्रेकिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे

Irshalwadi Landslide (संग्रहित संपादित प्रतिमा)

Trekking ban in Raigad:  इर्शाळवाडी (Irshalwadi) दुर्घटनेमुळे महाराष्ट्र हादरला आहे. दोन दिवसापुर्वी इर्शाळवाडी येथे  दरड कोसळून गावातील 27 जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे बचावकार्य अद्यापही सुरु आहे. 54 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव कार्याने 100 हून अधिक लोकांना बाहेर काढले आहे.  याच घटनेच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे रायगडावरिल ट्रेकिंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. पावसाळ्यात तरुण मंडळी ट्रेकींगसाठी येतात त्यासाठी प्रशासनाने निर्णय घेतला आहे.

इर्शाळवाडीत दुर्घटनेत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसाने कहर घातला आहे. पावसामुळे बचाव कार्य करणे मुश्किलीचे झाले आहे. त्यांचा बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांसाठी निर्णय घेतला आहे. रायगडमध्ये नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध घालण्यात आले आहेत. परिसरात बिना कारण वावरू नका असा ही आदेश देण्यात आला आहे.   दरड कोसळलेल्या घटनास्थळांच्या ठिकाणी व त्याच्या परिसरात इरसालगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणुक केलेल्या इतर व्यक्ती/ सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

जर या परिसरात या व्यक्तीव्यतिरिक्त इतर नागरिक, ट्रेकर्स मंडळी, पर्यटक आले असेल, तर भारतीय दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) नुसार दिनांक २३ जुलै ते दिनांक ६ ऑगस्ट या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश उपविभागीय दंडाधिकारी कर्जत अजित नैराळे यांनी लागू केले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. इर्शाळवाडी दुर्घटनेतून अद्याप नागरिक बाहेर आले नाही. त्यामुळे परिसरात दुखाचे वातावरण वाढले आहे. बचाव कार्यात अडथळे येत असल्यामुळे एनडीआरएफच्या जवानानी खंत व्यक्त केली आहे. काही कालावधीसाठी हा निर्णय असेल.